भरधाव डंपर चालकाची दोन दुचाकींना धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – राज्यात सध्या अपघाताचे (accident) प्रमाण वाढले आहे. गेल्या काही महिन्यांपासून हे सत्र सुरूच आहे थांबायचे काही नाव घेईना. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरिवलीत रात्री असाच एक भीषण अपघात (accident) झाला. यामध्ये एका भरधाव डंपरने दोन दुचाकीना जोरदार धडक दिली आहे. या दोन्ही बाईक डंपरखाली आल्यामुळे दुचाकीस्वार गंभीररीत्या जखमी झाले आहेत. या अपघातातील (accident) जखमींना सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

कुठे आणि कसा घडला अपघात?
बोरिवली पश्चिम भागातील बोरिवली ते गोराई रोडवर हा भीषण अपघात (accident) घडला. या अपघातात दोन्ही बाईकस्वार गंभीर जखमी झाले. त्यानां तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला हे मात्र अजून समजू शकलेले नाही. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून पुढील तपासाला सुरुवात केली.

या अपघातामुळे त्या ठिकाणी काही काळ अपघाताची समस्या निर्माण झाली होती. या अपघातात नेमकी चूक कुणाची, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. डंपरच्या डाव्या बाजूच्या चाकाखाली आलेल्या दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दुचाकीस्वार अगदी थोडक्यात या भीषण अपघातातून (accident) बचावले.

हे पण वाचा :
महाराष्ट्र नाही तर आता ‘या’ राज्यात मिळेल महाग पेट्रोल
शिंदे- फडणवीसांचा पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मास्टरस्ट्रोक : घेतले ‘हे’ 9 महत्वाचे निर्णय
Corona चा नवीन BA.5 व्हेरिएन्ट आधीपेक्षा जास्त घातक आहे ???
सध्याच्या जोखमीच्या काळात सोन्यामध्ये गुंतवणूक करावी की नाही ???|
ICICI Bank कडून FD वरील व्याज दरात वाढ !!!