आता दारूची बाटली बॉक्समधून मिळणार नाही; कंपन्यानी घेतला निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या देशात मद्य प्रेमीची संख्या ही प्रचंड मोठी आहे. त्यामुळे दारूबद्दल (Liquor) कोणताही निर्णय झाला की, त्याकडे सर्वांचे लक्ष असते. दारूचा ब्रँड कोणता आहे हे आपण दुकानाच्या बाहेर बसून सांगू शकतो. त्याच कारण म्हणजे दारूच्या बॉटलची केलेली पॅकिंग. त्याच्या बॉक्स वरून तुम्ही दारूचा ब्रँड कोणता ते सांगू शकता. मात्र आता हे शक्य होणार नाही. कारण दारुसाठी केली जाणारी पॅकिंग ही आता न करण्याचा निर्णय काही कंपन्यानी घेतला आहे.

कोणत्या कंपन्यांनी घेतला निर्णय?

दारूच्या प्रसिद्ध कंपन्यापैकी कंपनी म्हणजे सीग्राम आणि इतर नामांकित अल्कोहोलनिर्मितीमधील कंपन्यांनी मोनो कार्टन बॉक्समध्ये बाटल्या पॅक करणे बंद केले आहे. याचाच अर्थ आता दारूच्या दुकानातून बाटली घेतल्यानंतर तुम्हाला आधी सारखं बॉक्स मधून दारूची बॉटल मिळणार नाही. बाटली बाहेर असलेल्या बॉक्सचा ग्राहकाला काही एक फायदा होत नाही. त्यांना केवळ त्या बॉक्सवरील माहिती आणि ब्रँड हे आकर्षित करतात. यां बॉक्सच्या वापरामुळे सध्या पर्यावरणाला धोका निर्माण होत आहे. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण वाढत आहे. यामुळे अनेक समस्यात वाढ होताना दिसून येत आहे. तसेच प्रदूषणाची समस्या, बॉक्सची निर्मिती करण्यासाठी अनेक झाडांची तोड केली जाते. या सर्वामुळे पर्यावरणास हानी पोचत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कंपन्यानी दिली आहे.

सर्व स्तरावर या निर्णयाचे स्वागत

दारूच्या काही कंपन्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकजण खुश आहेत. पर्यावरणाचा विचार करून हा निर्णय घेतला असल्याचे अनेकजण बोलत आहेत. आता हे पाहणं गरजेचं आहे की, याचा पर्यावरणास किती आणि कसा फायदा होतो ते.तसेच या निर्णयामुळे मद्यप्रेमी नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे सुद्धा तितकंच महत्वाचे आहे.