सलग 12 तास..!! तरुणाच्या ट्रेडमिल रनिंगची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद; पहा VIDEO

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। वजन वाढू लागलं की जिममध्ये जायला हवं, असं प्रत्येकाला वाटतं आणि जिममध्ये गेल्यानंतर तिथली उपकरणे पाहून आधीच घाम निघायला लागतो. वजन कमी करण्यासाठी तसेच फिट राहण्यासाठी जिममधील प्रशिक्षक ट्रेडमिलवर धावायला लावतात. धावता धावता कधी धाप लागते ते कळतही नाही. असे असताना एका तरुणाने ट्रेडमिलवर सलग १२ तास धावून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव कोरले आहे. चला तर या तरुणाविषयी अधिक जाणून घेऊया.

सलग १२ तास ट्रेलमिलवर धावून केला अनोखा विक्रम

ओदिशामधील राहुरकेलाचा रहिवासी असलेल्या सुमित सिंह या तरुणाने हा अनोखा विक्रम केला आहे. तब्बल १२ तास ट्रेलमिलवर धावून त्याने आपले नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सामील करून घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुमितने १२ मार्च रोजी सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी ट्रेडमिलवर धावायला सुरुवात केली होती. यानंतर तो थेट रात्री ८ वाजून २० मिनिटांनी ट्रेडमिलवर थांबला. अशा प्रकारे त्याने आपला अनोखा विक्रम पूर्ण केला. सलग १२ तास धावून सुमितने ६८.०४ किलोमीटर इतके अंतर पार केले आहे. सध्या त्याच्या या अनोख्या विक्रमच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.

Attempt to break the Guinness World Record for 12 hours on a manual treadmill! 🏃‍♂️#trendingshorts

सुमितची उल्लेखनीय कामगिरी

सुमित सिंग या तरुणाने केलेला हा अनोखा विक्रम खरोखरच अत्यंत लक्षवेधी आणि तितकाच थक्क करणारा आहे. तब्बल १२ तास ट्रेडमिलवर धावून त्याने पार केलेल्या अंतराचा आकडा हा खरोखरच कौतुकास्पद आहे. माहितीनुसार, सुमितने याआधी २५ एप्रिल २०२३ ते १४ मे २०२३ या संपूर्ण कालावधीत एकूण ३३ मॅरेथॉन पूर्ण केले आहेत. याशिवाय उदित नगर स्टेडियमवर त्याने १३९२.६ किलोमीटरचे अंतर पार करून क्रीडा क्षेत्रात अत्यंत उल्लेखनीय कामगिरी देखील केली आहे. या कामगिरीसाठी त्याला आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले होते.

Guinness world record attempt||12 hours running on Manual treadmill #ytshorts #viralfeeds #marathon

व्हिडिओवर अभिनंदनाचा वर्षाव

सोशल मीडिया युट्युबवर हा व्हिडिओ sumitsinghultrarunner नावाच्या हॅण्डलवरून शेअर करण्यात आल्याचे दिसून येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून आतापर्यंत अनेक लोकांनी पाहिला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी सुमितच्या कामगिरीला सलाम ठोकत त्याचे अभिनंदन केले आहे. तर कमेंट्सच्या माध्यमातून युजर्स सुमितच्या अनोख्या विक्रमाचे कौतुक करत त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.