अरे बापरे! गर्लफ्रेंडचा साखरपुडा झाला म्हणून प्रियकराने ठेवला मुलाच्याच घराबाहेर बॉम्ब

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| प्रेमामध्ये सर्वजणच वेडे होतात असे आपण आजवर ऐकत आलो आहोत. परंतु वर्ध्यातील (Vardha) एका तरुणाने या वेडेपणाची हद्दपार करत नवरदेवाच्याच घराबाहेर बॉम्ब ठेवल्याचे कृत्य केले आहे. आपल्या गर्लफ्रेंडचा एका दुसऱ्या व्यक्तीसोबत साखरपुडा झाला असल्याची बातमी या तरुणाला मिळतात त्याने रागाच्या भरात नवरदेवाच्या घराच्या गेटवर खरा बॉम्ब ठेवला होता. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले होते. शेवटी पोलिसांनी घटनास्थळी दहावी या तरुणाला अटक केले.

…अन्यथा स्फोट होईल

समोर आलेल्या माहितीनुसार, आर्वीमध्ये राहणाऱ्या वंदना ज्ञानेश्वर कारमोरे यांच्या घराच्या गेटवर एक पिशवी अडकवण्यात आली होती. घराच्या बाहेर लावलेली ही पिशवी एका व्यक्तीने वंदना यांना आणून दिली. या पिशवीमध्ये टायमर आणि बॅटरी अशा अनेक गोष्टी ठेवण्यात आल्या होत्या. तसेच यामध्ये एक चिठ्ठी होती ज्यात लिहिले होते की “हात लावू नका अन्यथा स्फोट होईल.” या सर्व प्रकारामुळे वंदना चांगल्याच घाबरल्या. आणि त्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली.

पुढे पोलिसांनी या पिशवीतील वस्तूंची तपासणी केली. त्यातून हे समोर आले की, पिशवीत स्फोट होईल अशा वस्तू ठेवण्यात आल्या आहेत. यानंतर पोलिसांनी सर्व घटनेची व्यवस्थित चौकशी केली. यातून हे समोर आले की, गेल्या काही दिवसांपूर्वीच वंदना यांच्या मुलाचा साखरपुडा झाला होता. ज्या मुलीशी या मुलाचा साखरपुडा झाला, तिच्याच प्रियकराने भीती दाखवण्यासाठी ही बॉम्बसदृश्य वस्तू त्यांच्या घराबाहेर ठेवली होती. ही माहिती मिळताच पोलिसांनी मुलीच्या प्रियकराला अटक केली आहे. तसेच या वस्तू त्याने कुठून मिळवल्या याचा ते तपास करीत आहेत.