दैव बलवत्तर म्हणून वाचले विद्यार्थी; ब्रेक फेल बसमधून चालकाने मारली उडी अन्…, थरार CCTV मध्ये कैद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बारामतीच्या मोरगाव मधील एका खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांना, सहलीसाठी घेऊन घेलेल्या बसचे ब्रेक अचानक निकामी झाले. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत गाडीतून उडी मारून चक्क हाताने बस थांबवत मुलांचे प्राण वाचवले. याबाबतची घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून चालकाचे कौतुक केलं जात आहे.

३४ विद्यार्थ्यांसह मांढरदेवीचे दर्शन करून ही भोर वरंधघाट मार्गे रायगडला जात होती. भोर चौपाटीजवळ बसचा ब्रेक एअर पाईप फुटल्याने बसचे ब्रेक निकामी झाले. बसचे ब्रेक फेल झाल्याचे चालकाला समजताच त्यांनी अत्यंत सावधगिरीने चालत्या बस मधून बाहेर उडी मारली आणि बस खाली मोठा दगड टाकला. मात्र, तरी सुद्धा बस थांबली नाही, त्यानंतर त्यांनी चक्क बस हाताने थांबवण्याचा प्रयत्न केला.

ही गोष्ट आसपासच्या नागरिकांना समजल्यावर त्यांनी सुद्धा बस थांबवण्यासाठी प्रयत्न केले आणि बस थांबवली. केवळ चालकाच्या या प्रसंगावधानामुळं मोठी दुर्घटना टळली. हा प्रकार जवळच असलेल्या एका सीसीटीव्हीत कैद झाला. दरम्यान, बसमधले सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत. घटनेची माहिती मिळताच, पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थ्यांना धीर दिला.