आधारसोबत मोबाईल नंबर आणि ईमेल लिंक करणे झाले सोप्पे; UIDAI ने सुरु केले नवीन अ‍ॅप, वाचा सविस्तर

नवी दिल्ली : आपला मोबाइल नंबर आणि ईमेल आधारसोबत लिंक करणे आवश्यक आहे. जर आपण अद्याप तसे केले नसेल तर लवकरात लवकर करा म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही. यूआयडीएआयने आधारमध्ये मोबाइल नंबर आणि ई-मेलच्या पडताळणीची प्रक्रिया सुलभ केली आहे. आता आपण सहजपणे आपल्या मित्राची किंवा नातेवाईकांची देखील व्हेरीफिकेशन करू शकता. यासाठी तुम्हाला आधार अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल. या अ‍ॅपमध्ये, आपल्याला व्हेरीफाईड ईमेल आणि मोबाइलचा पर्याय दिसेल. यावर क्लिक करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी व्हेरिफाय करू शकता.

 

ही सेवा आधार कार्ड धारक आणि सेवा प्रदात्यांना हे समजण्यास सक्षम करेल की आधार एक वैध नंबर आहे आणि तो निष्क्रिय नाही. आधार ऑनलाईन सेवा आणि आधार संबंधित लाभांसाठी आधार नंबर धारक नोंदणीकृत मोबाइल नंबर आवश्यक आहे. रहिवासी त्यांचा मोबाइल नंबर आणि आधीपासून नोंदणीकृत ईमेल पत्ता व्हेरीफाईड करू शकतात.

यूआयडीएआयने नवीन सेवा सुरू केली

आधार वापरकर्त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी, युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) ‘विचारा आधार चॅटबॉट’ सुरू केला आहे. याद्वारे, वापरकर्त्यांना त्यांच्या तक्रारी आणि आधारशी संबंधित प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com