भाजपच्या नेत्यांना समोरासमोर बोलता येत नाही म्हणून पाठीवर खंजीर खुपसतात – प्रणिती शिंदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर : “भाजपकडून फोन टॅपिंग करुन खालच्या थराचं राजकारण केलं गेलं. समोरासमोर उभं राहुन त्यांना सामना करता येत नाही म्हणून ते पाठीवर खंजीर खुपसतात”, अशी घणघस्ती टीका काँग्रेसच्या नेत्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. फडणवीस सरकारच्या काळात भाजपकडून विरोधी पक्षातील नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला आहे. राज्यात सुरु असलेल्या फोन टॅप प्रकरणाविषयी प्रश्न विचारला असता आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

फोन टॅप करण्यासारखं खालच्या थराचं काम भाजपकडून करण्यात आलं. लोकांची सुरक्षा काढूण घेणं, फोन टॅप करणं या गोष्टी अतिशय चुकीच्या आहेत. आम्ही याची निंदा करतो”, अशा शब्दात प्रणिती शिंदे यांनी भाजपवर टीका केली.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरेगाव-भीमा प्रकरणाची चौकशी एसआयटीकडून व्हावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली होती. मात्र, त्यानंतर लगेच केंद्र सरकारने हे प्रकरण एनआयएकडे हस्तांतर केलं. यावर प्रश्न विचारला असता “एनआयएकडून योग्य तपास होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही”, असा विश्वास प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला.

Leave a Comment