मोदी सरकारचा अर्थसंकल्प गुंतागुंतीचा – राहुल गांधी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : यंदाच्या अर्थसंकल्पात कोणतीच ठोस तरतूद नाही, कररचना आणखी क्लिष्ट केलेली आहे, हा अर्थसंकल्प गुंतागुंतीचा असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिली आहे. अर्थसंकल्पात बेरोजगारांच्या मुद्यावर कोणताच उपाय नाही असेही ते म्हणाले.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, हे अर्थसंकल्पीय भाषण इतिहासातील सर्वात मोठे भाषण होते मात्र या भाषणात काहीही नव्हते. हे भाषण पोकळ होते. आजच्या घडीला बेरोजगारी ही मुख्य समस्या आहे. आजच्या तरुणांना जॉब मिळण्यासाठी अर्थसंकल्पात कोणतीही धोरणात्मक उपाययोजना करण्यात आलेली नाही.

नवीन कररचना

वार्षिक उत्पन्न कर
अडीच ते ५ लाख ५ %
५ ते ७:५० लाख १०%
७:५० ते १० लाख १५ %
१० ते १२:५० लाख २०%
१२:५० ते १५ लाख २५%
१५ लाखाच्यावर ३०%

 

Leave a Comment