अंतर्राष्ट्रीय योग दिवस २०१८ – “मी फिट तर..माझा देश फिट”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

प्रत्येकाची शरीर-रचना ही वेगवेगळ्या पद्धतीने तयार झालेले असते. त्यात दिनचर्या, जीवनपद्धती, आहार,आजूबाजूचे वातावरण ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. बाह्य शरीर व अंतर्मन या विशिष्ट घटनांमूळे आपण आपले आरोग्य निरोगी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. नविन नविन गोष्टी आत्मसात करणे ही आता सर्वांची गरज झाली आहे. त्या गरजेला योग्य खतपाणी घालणे हे सर्वांचे कर्तव्य आहे. तुलनात्मक जगण्यापेक्षा मला कशात आनंद घेता येईल हे जास्त जरुरी आहे.

नियमितपणा व सातत्य जर असेल तर कोणत्याही समस्येवर आपण मात करू शकतो. wellness,fitness..या शब्दांचा अर्थ लिहून, वाचून व बोलून होत नाही. मनाशी ठराव, इच्छाशक्ती आणि चिकाटी असणे खूप महत्वाचे आहे. योगा करणे ,व्यायाम करणे, जीम, कथक, डान्स किंवा प्रत्येकाच्या आवडी प्रमाणे शरीराची शाररीक हालचाल करून आपले शरीर मोल्ड करता येऊ शकते. पण या सर्व साधनेत नियमितता असेल तरच निरोगी असण्याचा मंत्र सहजगत्या मिळतो. ‘मी फिट तर कुटुंब फिट, माझे कुटुंब फिट तर माझा समाज फिट , आणि माझा समाज फिट तर माझा देश फिट’ हे आपणाला समजायला हवं.

योगा कसा,केव्हा,कधी चालू करायचा? हे प्रश्न मनाला सतावत असतात. त्यात वयाचा विचार ….. इतके वर्ष केले नाही तर आता या वयात जमेल का? व्यायाम केला तर काही शरीराला त्रास होईल का? वेगळाच त्रास…मग डॉक्टर …पटकन परिणाम मिळण्यासाठी आहार तंज्ञ… असे प्रश्न भेडसावतात. कोणतीही कला वा योग साधना शिकण्यासाठी वयाची अट नसते. हे अनुभवातूनच उमजते. सर्व प्रथम आपले वय,शरीर,आकार,पूर्वी असलेला त्रास,औषध उपचार यांचा एक चार्ट तयार करुन नंतर त्याचे नियोजन करणे सोपे होते. योगासाठी वेगळा विशेष खर्च न करता पण थोडा वेळ काढून शरीराला निरोगी ठेवता येते.सुरुवातीला रोज एक एक आसन १०-१५ मिनिट सातत्याने असे एक आठवडा करणे. कोणत्याही प्रकारे अतिताण शरीरावर येऊ न देता सहजतेने व्यायाम करणे. एका आठवड्यानंतर तुम्ही आपापल्या क्षमते नुसार वेगवेगळे आसन वाढू शकतात. त्यानंतर शरीर सक्षम झाले आहे ही सूचना आपल्याला नकळत मिळत असते. आपला उत्साह द्विगुणीत होतो. मग आपणच आपले उत्कृष्ठ डॉक्टर होतो.
दुसऱ्याला सल्ले न देता आपली योग साधना चालू ठेवणे. व्यायामाचा वेळ वाढून, जर विशिष्ठ अतिताण इतर कोणत्याही अवयांवर जाणवत असेल तर दुसऱ्या दिवशी तो व्यायाम न करणे. रोज चालणे यात कोणताही तोटा वा नुकसान नाही तसेच योगासने करणे यात तर फायदाच फायदा !
हल्लीच्या युगात तुम्हांला हवे ते आसन, हवी ती कला आत्मसात करता येते. त्यासाठी विविध माध्यमे उपलब्ध आहेत. उदा.video,CDS,BOOKS,T.V. CHANNELS वर तर खूप माहिती जमा करता येते.
सर्वांनी एक मुद्दा नेहमीच लक्षात ठेवला पाहिजेल, कोणती कला शिकतांना /जोपासंताना गुरु यांच्या मार्गदर्शना खाली शिकणे गरजेचे आहे. तुमचे शरीर मुद्रा, श्वास कुठे घेयचा, कुठे सोडायचा? याचे प्रशिक्षण मिळणे आवशक्य असते. आता तर योग शिक्षण पूर्ण करून बरेच स्वयंसेवक योगाचा प्रचार करत आहेत. २१ जून जागतिक योग दिवस म्हणून साजरा करतात.
काही कारणाने योगा करणे जमले नाही तरी चालू शकते. पण हेच कारण रोज कॅरी करणे योग्य नव्हे. परत २-३ दिवसांनी आपले दिनक्रम चालू ठेवणे. तो/ती खूप छान योगा करतात, रामदेव बाबांचे शरीर तर खूप लवचिक आहे……..मलाच का जमत नाही? असे प्रश्न मनात नक्कीच घर करतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चांगले गुण असतातच, तसेच चांगले योग शरीर पण असतेच असते. अपंग लोक त्यांचा अवगुणांवर ही विजय मिळवतांना आपण बघितले आहे. ‘योगा’ स्व:ताला परमाआनंदकडे नेणारे शस्त्र आहे. ‘योग आनंद’ हे मनाच्या शांततेचे एक उत्कृष्ठ साधन आहे.

सौ.सरिता संदीप चितोडकर
कोथरूड ,पुणे
[email protected]

(लेखिका कंप्यूटर इन्फोटेकच्या संचालिका असून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत.)

Leave a Comment