अब्दुल सत्तार गद्दार आहेत – शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंची घणाघाती टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : अब्दुल सत्तार गद्दार आहेत, त्यांना मातोश्रीची पायरी चढू देऊ नका, सत्तारांची गद्दारी सहन करणार नाही अशा शब्दांत शिवसेना नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले. सत्तार यांच्यामुळेच औरंगाबादेत भाजपचा उपाध्यक्ष निवडून आल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. आज झालेल्या औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसचा अध्यक्ष तर भाजपचा उपाध्यक्ष निवडून आला आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर टीकास्त्र डागले.

अब्दुल सत्तार यांनी नुकताच राज्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. यावरून अब्दुल सत्तार यांना लक्ष्य करताना खैरे यांनी अब्दुल सत्तार यांना गद्दार संबोधले. खातेवाटप आज संध्याकाळी होईल अशी माहीती मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. खातेवाटप होण्याच्या आधीच पक्षातील नाराजी समोर येताना दिसत आहे. अब्दुल सत्तार उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटतील अशी माहिती अर्जुन खोतकर यांनी दिली आहे. दुसरीकडे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिल्यामुळे नाराज आहेत. ते देखील आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave a Comment