Breaking | उदयनराजे ९४ हजारांनी पिछाडीवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकांचे कल हाती येत असतानाचा सातारा लोकसभा पोटनिवडणुकीकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे उदयनराजे भोसले सध्या पिछाडीवर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीनिवास पाटील ९४ हजार मतांनी आघाडीवर आहेत. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीतून खासदारकी मिळविली होती.

मात्र काही महिन्यात उदयनराजे भोसले यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. त्यानंतर ही पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. उदयनराजे भोसले यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातारा येथे जाहीर सभा घेतली होती. साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक ही भाजपाने प्रतिष्ठेची केली होती.

या निवडणुकीबाबत शिवसेनेचे संजय राऊत म्हणाले होते की, उदयनराजे तीन महिन्यांपूर्वी एका पक्षातून निवडून येतात. ३ महिन्यात तुमचं ह्दयपरिवर्तन होतं. दुसऱ्या पक्षात जाऊन लोकांवर निवडणूक लादता. लोकांना गृहित धरण्याचा परिणाम या निवडणुकीत दिसेल. भाजपातून निवडणूक लढवायची होती तर आधीच लढवायची होती. लोकसभा पोटनिवडणुकीसाठी २०-२५ कोटी सरकारी तिजोरी खर्च करुन लोकांवर निवडणूक लादावी याचा परिणाम १०० टक्के निकालात दिसेल असं त्यांनी सांगितले होते.

सातारकरांचं प्रेम छत्रपतींच्या गादीला की पवारांच्या साथीला | Udayanraje Bhosale | Sharad Pawar

Leave a Comment