जेएनयूचे विद्यार्थी वंदे मातरम् गात नाहीत, त्यांचा आवाज दाबण्यासाठी आपला आवाज वाढविला पाहीजे – सुधीर मुनगंटीवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) विद्यार्थ्यांविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.  ते म्हणाले की, जेएनयूचे विद्यार्थी वंदे मातरम् गात नाहीत. त्यांचा आवाज दाबण्यासाठी आपला आवाज वाढविला पाहिजे. ते जगाला काय दाखवू इच्छितात.

मुनगंटीवार म्हणाले की, देशात बरीच विद्यापीठे आहेत. हिंसा फक्त अलिगड मुस्लिम विद्यापीठ आणि जामियामध्ये का होते. भाजप नेत्यांनी सांगितले की तुम्ही जर रस्त्यावर हिंसाचार पसरविला तर पोलिस कारवाई करतात. देशात लोकशाही नाही असे ते का म्हणतात?

जेएनयू गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. फी वाढविण्याच्या विरोधात विद्यार्थ्यांच्या निषेधाने पूर्वी लोकांचे लक्ष वेधून घेतले. यानंतर, मुखवटा घातलेल्या लोकांनी जेएनयू कॅम्पसमध्ये घुसून रविवारी विद्यार्थ्यांवर हल्ला केला. या घटनेचा संपूर्ण देशात विरोध होत रआहे.त्याचवेळी, अभिनेत्री दीपिका पादुकोण मंगळवारी हिंसाचाराच्या विरोधात विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ जेएनयू कॅम्पसमध्ये पोहोचली तेव्हा संपूर्ण देशाचे माध्यमांचे लक्ष जेएनयूकडे गेले.

Leave a Comment