निर्भया बलात्कार प्रकरणातील नराधमांना २२ जानेवारीला फाशी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : देशाला हादरून टाकणाऱ्या निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींना २२ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता फाशी देण्यात येणार आहे. या प्रकरणातील चारही गुन्हेगारांची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे.दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने याप्रकरणातील चारही आरोपींविरोधात डेथ वॉरंट जारी केलं आहे. या सुनावणीवेळी सर्व आरोपी व्हिडिओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे हजर होते.

निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपी मुकेश, विनय शर्मा, अक्षय कुमार सिंह व पवन गुप्ता यांना न्यायालयाने यापूर्वीच फाशीची शिक्षा सुनावलेली आहे. हे चौघेही गुन्हेगार तिहार तुरुंगात होते. आज त्यांच्या डेथ वॉरंटवर कोर्टात सुनावणी झाली. सुनावणीवेळी आरोपींचे वकील आणि निर्भयाच्या आईमध्ये शाब्दिक चकमकही उडाली. दरम्यान, ही सुनावणी सुरू असताना निर्भयाची आणि आरोपी मुकेशची आई कोर्टात रडल्या.

काय आहे प्रकरण?

आठ वर्षांपूर्वी, १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीत एका तरुणीवर चौघा नराधमांनी सामूहिक बलात्कार केला होता. या अत्याचारामुळं गंभीर जखमी झालेल्या निर्भयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती.

Leave a Comment