पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर? राज्यात राजकीय भुकंपाची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी | भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना परळी विधानसभा मतदार संघात पराभवाला सामोरे जावे लागले होते. राष्ट्रवादीचे नेते आणि पंकजा यांचे बंधु धनंजय मुंडे यांनी पंकजा यांना विधानसभा निवडणुकीत धुळ चारली होती. त्यानंतर पंकजा यांनी पराभव मान्य करत पक्षाच्या मिटींगला हजेरी लावणे सुरु केले होते. मात्र पंकजा यांच्या पराभवात त्यांच्याच पक्षातील काही बड्या नेत्यांचा हात असल्याची चर्चा निकालानंतर रंगात होती. आता याला पुष्टी देणारे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केले आहे.

आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भांचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे अशा आशयाची फेसबुक पोस्ट पंकजा यांनी शेअर केल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पंकजा यांच्या सदर फेसबुक पोस्टनंतर राज्यातील राजकारणात आणखी एक भुकंप येणार काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. पंकजा मुंडे यांनी येत्या १२ डिसेंबरला मुंडे साहेबांच्या जन्मदिनी आपण पुढे कोणत्या मार्गाने जायचं हे जाहीर करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे पंकजा शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे.

निवडणुका झाल्या निवडणुकीचे निकाल ही लागले. निकालानंतर राजकीय घडामोडी, कोअर कमिटीच्या बैठका, पक्षाच्या बैठका, हे सर्व आपण सर्वजण पहात होता. पराभव झाल्यानंतर काही क्षणातच माध्यमांसमोर जाऊन मी तो स्वीकारला. आणि विनंती केली की कुणीही याची जबाबदारी कुणावरही टाकू नये. सर्व जवाबदारी माझी आहे असं म्हणत पंकजा यांनी विधानसभा निवडणुकीतील निकालाची जबाबदारी आपली असल्याचं सांगतलं आहे. तसेच ‘आधी देश,नंतर पार्टी आणि शेवटी स्वत:’ हे संस्कार आमच्यावर लहानपणापासून झालेले आहेत. जनतेप्रती आपल्या कर्तव्यापेक्षा मोठं काहीही नसतं असं मुंडेसाहेबांनी लहानपणापासून शिकवलेलं आहे. त्यांच्या शिकवणी नुसार त्यांच्या मृत्युनंतर अगदी तिसऱ्याच दिवशी मी कामाला लागले असं म्हणत आपण पार्टीच्या आधी देशासोबत बांधील असल्याचं पंकजा यांनी स्पष्ट केले आहे.

मुंडेसाहेबांचा आदेश म्हणून मी राजकारणात आले आणि नंतर मुंडेसाहेबांच्या पश्चात जनते प्रती असलेल्या जवाबदारी म्हणुन राजकारणात राहीले. आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भांचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे. आपण मला वेळ मागत आहात.. मी आपल्याला वेळ देणार आहे…
आठ ते दहा दिवसांनंतर…हे आठ-दहा दिवस मला थोडासा स्वत:शी संवाद साधण्यासाठी वेळ हवाय. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे असं पंकजा यांनी म्हटले अाहे.

12 डिसेंबर,लोकनेते मुंडे साहेबांचा हा जन्मदिवस…त्या दिवशी बोलेन तुमच्याशी मनसोक्त…जसं तुम्हाला माझ्याशी बोलावं वाटतं, बघावं वाटतं.. तसं मलाही तुम्हाला बोलावं वाटतं. मी महाराष्ट्राच्या लोकांच्या विषयी बोलतेय …तुमच्याशी संवाद ही उत्सुकता माझ्या मनात आहे..नाहीतरी कोणाशी बोलणार आहे मी? तुमच्याशिवाय माझं कोण आहे? 12 डिसेंबरला आपल्या गोपीनाथगडावर भेटू !! असं म्हणत

Leave a Comment