लातूरचे प्रेमीयुगुल बीड बसस्थानकात पकडले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड, प्रतिनिधी नितीन चव्हाण : बसस्थानकामध्ये अल्पवयीन मुलगा आणि मुलगी संशयास्पद दिसून आल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले व त्यांची चौकशी केली असता सदरील हे अल्पवयीन जोडपे पळून आल्याचे उघडकीस आल्यानंतर याची माहिती लातूर पोलिसांना कळविण्यात आली होती.

शिवाजीनगर पोलिसांना बीड बसस्थानकामध्ये एक मुलगा आणि मुलगी दिसून आले. या दोघांच्या हालचाली संशयास्पद असल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी केली असता आपण पळून आल्याचे त्यांनी सांगितले. याबाबतची तक्रार लातूरच्या एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये दाखल झालेली होती. शिवाजीनगर पोलिसांनी या अल्पवयीन जोडप्याची माहिती लातूर एमआयडीसी पोलिसांना कळविल्यानंतर लातूर पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलास सदरील बाब कळविली होती. त्यानुसार मुलीचे आई-वडिल आणि पोलिस बीडमध्ये दाखल होणार होते.

Leave a Comment