स्कूटीची डिक्की तोडून दिवसाढवळ्या 8 लाखाची कॅश पळवली; बीड शहरातील घटना

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बीड, दि.4 प्रतिनिधी,नितीन चव्हाण : शहरातील स्वराज्यनगर परिसरातील एटीएम येथून स्कूटीची डिक्की तोडून आठ लाखाची कॅश लंपास करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि.4) दुपारी एकच्या सुमारास बार्शी रोडवर घडली. घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.ऋषिकेश भारत गणगे यांनी स्वराज्य नगर परिसरात एक एटीएम चालवण्यासाठी घेतले आहे.

नेहमी प्रमाणे त्यांनी बँकेतून पैसे एटीएम मध्ये भरण्यासठी आणले होते. 8 लाख रूपये स्कूटीच्या डिक्कीमध्ये ठेवले होते. एटीएम शेजारीच त्यांचे हॉटेल आहे. हॉटेलमधून वडीलाकडील चावी घेण्यासाठी तो हॉटेलकडे गेला. यावेळी मागे पाळतीवर असलेल्या दोघांनी डिक्की तोडून पैसे घेवून दुचाकीवर पोबारा केला. काही सेकंदात हा प्रकार घडला. घटनास्थळी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवलाल पुरभे यांनी धाव घेतली असून पुढील तपास करीत आहेत.

Leave a Comment