पाकिस्तानी गायक अदनाम सामीच्या पद्मश्रीला मनसेचा विरोध; पुरस्कार रद्द करण्याची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : केंद्र सरकारने प्रसिद्ध गायक अदनान सामीला दिलेल्या पद्मश्री पुरस्काराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) विरोध केला आहे. अदनान सामी मूळ भारतीय नागरिक नसल्याचं कारण सांगत मनसेने अदनान सामीचा पुरस्कार रद्द करण्याची मागणी केली आहे. मनसेचे उपाध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करत मनसेची भूमिका जाहीर केली.

अमेय खोपकर म्हणाले, “मूळ भारतीय नागरिक नसलेल्या अदनान सामीला भारत सरकारने कोणताही पुरस्कार देऊ नये, असं मनसेचं ठाम मत आहे. त्यामुळे त्याला बहाल केलेल्या पद्मश्री पुरस्काराचा मनसेकडून तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे. अदनान सामीला जाहीर झालेला पद्म पुरस्कार त्वरित रद्द करण्यात यावा, अशी मनसेची मागणी आहे.”


https://twitter.com/MNSAmeyaKhopkar/status/1221101472106106880?s=19

त्याला एवढं लिफ्ट करण्याचं कारण काय?

अमेय खोपकर म्हणाले, सुरेश वाडकर यांना पद्मश्री मिळाल्याचा आनंद साजरा करतोय, तोच आनंदावर थोडं विरजण पडलं अदनान सामीला दिलेल्या पद्मश्रीमुळे. २०१५ मध्ये म्हणजे मोदींच्याच काळात त्याला भारतीय नागरिकत्व मिळालं आणि लगेच चार वर्षात त्याला पद्मश्रीही बहाल केला. त्याला एवढं लिफ्ट करण्याचं कारण काय?

Leave a Comment