अजित पवार देखील परत येतील – संजय राऊत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । शनिवारी सकाळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली . तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली . या राजकीय पालटवारने महाराष्ट्रात एकच खळबळ माजवली . गेले २८ दिवस शिवसेना ,राष्ट्रवादी ,काँग्रेस यांनी अनेक बैठका घेतल्या. एकीकडे अवकाळी पाऊस आणि शेतकरी प्रचंड संकटात असताना सत्ता स्थापनेचा तिढा सुटता सुटेना . शुक्रवारी हा तिढा अखेर सुटेल आणि शनिवारी शिवसेनेची तोफ धडाडेल असं महाराष्ट्राला पटवून देण्यात आले होते . आणि शनिवारी जे घडले ते पाहून महाराष्ट्र हादरला . राजकारणात काहीही होऊ शकत हे महाराष्ट्राने याची देही याची डोळा पाहिल … सकाळी भाजपने अजित पवारांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली . आणि मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री पदी अजित पवार यांनी शपथ घेतली .

हि बातमी जशी समजली तशी शरद पवार आणि शिवसेनेच्या पुढच्या भूमिकेवर महाराष्ट्राचं लक्ष लागले आहे . राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं एकत्रित पत्रकार परिषद घेऊन अजित पवार आणि जे आमदार फुटतील यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले . तर संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले कि , अजित पवार यांना ब्लॅकमेल करण्यात आले आहे . धनंजय मुंडे यांच्याशी देखील संपर्क झाला असून , अजित पवार देखील परत येतील असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला .

आता एकंदरीत जे घडतंय त्याचा काहीच अंदाज महाराष्ट्राच्या जनतेला लागत नाहीये . भाजपने अजित पवार यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली हे सत्य आहे . यामुळे महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण ढवळून निघालय . आता केव्हा काय होईल याचा अंदाज देखील लावणं कठीण झाल्याने होईल ते पाहत राहणे एवढाच पर्याय सध्या समोर आहे .

Leave a Comment