औरंगाबादेत बांधकाम विभागाचा २० कोटी रुपयांचा निधी परत जाण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी ।  जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा वीस कोटी रुपयाचा निधी परत जाण्याची शक्यता आहेत कारण हा निधी गेल्या वर्षभरापासून अखर्चित राहिल्याने हा मार्चपर्यंत खर्ची होईल का असा गहन प्रश्न प्रशासनासमोर उभा राहिला आहे.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कोटींचा निधी अजून अखर्चित आहे आणि मार्च अखेरपर्यंत हा निधी परत जाण्याची शक्यता आहे. पूल आणि रस्ते बांधण्यासाठी असलेल्या पंचवीस कोटी रुपये खर्ची असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. ही रक्कम जर मार्च अखेरपर्यंत कर्ज झाली नाही तर हा निधी सरकारदरबारी परत जातो.

या उरलेल्या निधीमुळे दोन वर्षापुर्वी मिळालेल्या रकमेचे नियोजन झाले नसल्याचे समोर आले आहे. आता एका महिन्यात यांनी नियोजन कसं करावं असा आव्हान प्रशासनासमोर उभ राहिले आहे. तत्कालीन बांधकाम सभापती आणि बांधकाम विभागाचे अभियंता यांनी या निधीचे नियोजन केले नाही. रस्त्याची कामे आणि पुलाची कामे तसेच पडून आहेत. रस्त्यांची कामे केली असती तर त्याचा ग्रामीण भागातील जनतेला फायदा झाला असता मात्र आता हा निधी खर्चाचं नियोजन कसं करावं असा पेच निर्माण झाला आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment