तुझ माझ जमेना तुझ्या वाचून करमेना असं म्हणत शरद पवारांनी दिली माढ्यात बबन शिंदेंना उमेदवारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

माढा प्रतिनिधी | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माढ्याचे आमदार बबन शिंदे यांच्यात फाटल्याची चर्चा माध्यमात होती. गणेश उत्सवात बबन शिंदे हे शरद पवारांना भेटायला गेले तेव्हा शरद पवारांनी त्यांना भेट नाकारली. मात्र बबन शिंदे शिवाय माढ्याची जागा कायम ठेवता येणार नाही असा सारासार विचार करून शरद पवारांनी बबन शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

कोल्हापूर सांगलीतील पूरग्रस्तांना राष्ट्रवादीच्या एकत्रित मदतीत पैस जमा नकरता बबन शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन १० लाखांचा चेक दिला . तेव्हा बबन शिंदे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला ऊत आला. मात्र भाजपमध्ये त्यांना घेतले नाही. कारण त्यांना भाजपमध्ये घेण्यास अकलूजच्या मोहिते पाटील यांचा विरोध होता. त्यानंतर बबन शिंदेंनी राष्ट्रवादीला आपल्या निष्ठेचा पोवाडा ऐकवला मात्र चाणाक्ष शरद पवारांनी त्यांचं राजकारण हेरत संजय पाटील घाटणीकर यांना माढ्याच्या उमेदवारीसाठी बळ देण्यास सुरुवात केली. परंतु बबन शिंदे यांनी आना भाका वाहून शरद पवारांचा रुसवा काढलाच !

बबन शिंदे हे आपले पुत्र रणजित शिंदे यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देण्यास आग्रही होते. मात्र राष्ट्रवादीने बबन शिंदे हेच फक्त निवडणूक जिंकू शकतात असा निष्कर्ष पुढे करत बबन शिंदे यांना उमेदवारी दिली. १९९५ पासून आज तागायत म्हणजे सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. यावेळी भाजपच्या उमेदवारापुढे त्यांचा निभाव लागणे कठीण आहे. मात्र बबन शिंदे निवडून येतील असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment