मराठा समाजाच्‍या नेत्‍यांनाच मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही – चंद्रकांत पाटील यांचा गंभीर आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मराठा समाजाच्‍या नेत्‍यांनाच मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही. त्‍यांना आपल्‍या समाजातील लोक रिकामे राहवेत, शहाणे होऊ नयेत असेच वाटत असते. कारण ती मानस त्‍यांच्‍या मागे फिरण्‍यास उपयोगी पडतात. असा  गंभीर आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

आ. पाटील पुढे म्‍हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी भारतीय जनता पक्ष सुरवातीपासूनच आक्रमक आहे. जे आबीसींना तेच मराठा समाजाला अशी भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. त्‍यामुळे भाजपचे सरकार असताना मराठा समाजाला आम्‍ही आरक्षण मिळवून दिले. सत्तेवर आल्‍यानंतर हे आरक्षण देखील काँग्रेसच्‍या सरकारला टिकवता आले नाही.

आता सरकार म्‍हणत आहे कि नोकर भरतीमध्‍ये तेरा टक्के आरक्षण आम्‍ही बाजूला काढून ठेवू .पण तेरा टक्‍के स्‍वतंत्र जागा भरता येणार नाही. कारण ज्‍यावेळी पुन्‍हा तेरा टक्‍के जागांची भरती काढली जाईल तेव्‍हा पुन्‍हा अन्‍य जाती, जमातींचेही आरक्षण त्‍यात असणार आहे. आणि या तेरा टक्‍के जागा भरावयाच्‍या झाल्‍यास मराठा समाजाच्‍या आरक्षणाला मान्‍यता मिळाली पाहिजे. तरच या जागा सरकारला भरता येणार आहेत. असेही आ. पाटील म्‍हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment