मतलबी कोण आहे हे शेतकरी जाणतात; राजू शेट्टींच्या टीकेला चंद्रकांतदादांचे उत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी  

दूर दरवाढ आंदोलनावरून सध्या भाजप आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. दुधाचे दर वाढवून प्रति लिटर पाच ते दहा रुपये अनुदान द्या. दुग्धजन्य पदार्थांवरील जीएसटी रद्द करण्यात या मागणीसाठी स्वाभिमानी आणि भाजप सध्या आक्रमक असून दोघांमध्ये सध्या शाब्दिक युद्ध सुरु आहे. दरम्यान, भाजपाचे दुध आंदोलन मतलबी असल्याची टीका स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली होती. या टीकेला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज उत्तर दिले.

”मतलबी कोण आहे हे शेतकरी जाणतात आमचे आंदोलन शेतकऱ्यांना मतलबी वाटते का हे महत्त्वाचे आहे” असा खोचक उत्तर चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टी यांना दिलं. आज कराड येथील कृष्णा हॉस्पिटलच्या विभागात भेट दिल्यांनतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी, पत्रकारांनी चंद्रकांत परील यांना राजू शेट्टींच्या दूध दरवाढी आंदोलनावर विचारले असता, ”राजु शेट्टी काय म्हणतो याला काय महत्व आहे. माध्यम प्रसिद्ध देतात म्हणून ते काहीही काही बोलतात. खरं तर माध्यमांच्या ही मनातून शेट्टी कधीचं उतरले आहेत असं पाटील यावेळी म्हणाले. ज्यांनी एका काळात शरद पवार यांच्या विरोधात आंदोलन केले होते तेच आज त्यांच्या घरी जेवायला जातात. याला काय अर्थ आहे. पवार सुतासारखे सरळ झाले कि हे शरण गेले समजा असा टोला चंद्रकांत पाटील यांनी यावेळी शेट्टींना लगावला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment