मुंबई |  मुंबई हायकोर्टानं 65 वर्षावरील कलाकार, टेक्निशियन आणि संबंधितांना कामाची परवानगी दिली आहे. कोरोना लॉकडाऊनदरम्यान महाराष्ट्र सरकारने चित्रपटांच्या शूटिंग संबंधित एक गाईडलाइन जारी केली होती. आता मात्र मुंबई हायकोर्टाने सरकारच्या गाईडलाइनमध्ये बदल करून 65 वर्षांवरील कलाकारांना शूटिंगची परवानगी दिली आहे.

लॉकडाऊनच्या काळात शूटिंगबाबत महाराष्ट्र सरकारने गाईडलाइनसोबत शूटिंगला परवानगी दिली होती. मात्र, 65 वर्षांवरील कलाकार, टेक्निशियन आणि डायरेक्टर तसेच कोणत्याही क्रिएटिव्ह व्यक्तीला शूटिंगसाठी सेटवर जाण्यास बंदी घालण्यात आली होती. यानंतर या मुद्द्यावरून बॉलिवूडचा महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी नाराजी व्यक्त केली होती. ज्येष्ठ कलाकार शूटिंगच्या सेटवर नसतील तर काम पूर्णच होऊ शकत नाही. त्यामुळे राज्य सरकारने आपल्या गाईडलाईनमध्ये बदल करावा, अशी मागणी करण्यात आली होती.

मात्र, महाराष्ट्र सरकारने ही गाईडलाईन केंद्र सरकारची असल्याचं सांगून या याप्रकरणातून अंग झटकलं होतं. यानंतर प्रोड्यूसर फेडरेशनने मुंबई हायकोर्टात याबाबत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुंबई हायकोर्टानं 65 वर्षांवरील कलाकारांना शूटिंगपासून रोखण्याचा सरकारचा निर्णय रद्द ठरवला आहे. 65 वर्षावरील कलाकार, टेक्निशियन आणि संबंधितांना कामाची परवानगी देण्यात आली आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook