बुलडाण्यातील नागरिकांचा निवडणुकीवर बहिष्कार; गावात लावले फलक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बुलडाणा प्रतिनिधी । बुलडाणा विधानसभा मतदार संघातील मोताळा तालुक्यातील वडगाव महाळुंगे या गावांमध्ये गेल्या पाच वर्षापासून गावात जाण्यासाठी रस्ता नाही. गावांमध्ये पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही. गेल्या पाच वर्षापासून गावांमध्ये कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नसल्याने वडगाव महाळुंगे येथील गावकऱ्यांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला असून जोपर्यंत गावाचा विकास होणार नाही तोपर्यंत मतदान करणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे. अशा आशयाचा फलक देखील गावात लावला आहे.

लोकसभा निवडणुकी अगोदर या गावकऱ्यांना बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी आश्वासन दिले होते. की, गावामध्ये येण्या-या मुख्य रस्त्याचे काम पूर्ण करेल,  मात्र सहा महिने उलटूनही तो रस्ता पूर्ण झाला नाही.

तसेच बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनीही या गावकऱ्यांना आश्वासन दिले होते की, ‘या गावाचा मी विकास करणार’, मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये कोणत्याही प्रकारचा विकास न केल्याने गावकऱ्यांनी या रस्त्याच्या व गावातील होणाऱ्या त्रासाला कंटाळून मतदानावरच बहिष्काराचा पवित्रा घेतला आहे.

Leave a Comment