हिमाचल प्रदेशमध्ये गर्भवती गायीला चारली स्फोटके; व्हिडिओ व्हायरल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केरळमधील पलक्कड जिल्ह्यात एका गर्भवती हत्तीणीला अननस मधून स्फोटके खायला दिल्याची घटना अजून ताजी आहे. यामध्ये त्या हत्तीणीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी केरळ सरकारने एकाला अटक केली आहे व त्याची चौकशी सुरु आहे. सोशल मीडियावर या घटनेच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तोवर हिमाचल प्रदेशमध्ये एका गर्भवती गायीला खाण्यातून स्फोटके दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर पोलिसांनी तात्काळ याची नोंद घेत गुन्हा दाखल केला आहे.

हिमाचल प्रदेशमधील बिलासपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. या गायीच्या मालकाने हा व्हिडीओ व्हायरल केला आहे. गायीच्या जबड्याला जबर दुखापत झाली आहे, तिच्या तोंडातून मोठ्या प्रमाणात रक्त येत असल्याचे व्हिडिओत स्पष्टपणे दिसत आहे. बिलासपूरच्या जनदत्ता परिसरातील गुर्दील सिंह यांच्या गायीच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. याबाबत गुर्दील सिंह यांनी त्यांचे शेजारी नंदलाल यांच्यावर या कृत्याचा आरोप केला आहे. 

दरम्यान नंदलाल फरार असल्याची माहिती गुर्दील सिंह यांनी दिली आहे. हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. असले प्रकार राज्यात खपवून घेतले जाणार नाहीत असे त्यांनी सांगितले आहे. त्यांनी पोलिसांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल असेही त्यांनी सांगितले आहे.

Leave a Comment