जेएनयुतील रुमची तोडफोड केल्याप्रकरणी हल्लेखोरांची ओळख पटली; आइशी घोषसह ९ जणांवर ठपका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । गेल्या रविवारी जवाहरलाल नेहरू विद्यापीठामधील सर्व्हर रुमची तोडफोड केल्याप्रकरणी अज्ञात हल्लेखोरांची ओळख आम्हाला पटली असल्याची माहिती दिल्ली पोलिसांकडून पत्रकारांना देण्यात आली आहे. याबाबतचे फोटोही पुरावे म्हणून पोलिसांनी पत्रकार परिषदेत सादर केले. आम्ही आत्तापर्यंत काही संशयितांना ताब्यात घेतलेलं नाही मात्र हल्लेखोर डाव्या संघटनांशी संबंधित होते असं गुन्हे अन्वेषण विभागाचे डीसीपी जॉय टिर्की यांनी पत्रकार परिषद म्हटलं आहे.

दरम्यान, जेएनयूमधील सर्व्हर रुमची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांची ओळख पटवली आहे. त्यात जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आइशी घोषसह जेएनयूचा माजी विद्यार्थी चुनचुन कुमार, सुचेता आणि प्रिया रंजन यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र, “मी कोणतीही चूक केलेली नाही. माझी चौकशी करायची असेल तर खुशाल करा माझ्याकडेही माझ्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याचे पुरावे आहेत” असं आइशी घोषनं म्हटलं आहे.

जेएनयूमध्ये रविवारी रात्री सर्व्हर रूममध्ये करण्यात आलेल्या हल्ल्यात या विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचं आढळून आलं आहे. जेएनयूच्या हिंसेबाबत अनेक गैरसमज पसरविण्यात आल्याचं गुन्हे अन्वेषण विभागाचे डीसीपी जॉय टिर्की यांनी म्हटलं आहे. एसएफआय, एआयएसए, एआयएसएफ आणि डिएसएफ आदी विद्यार्थी संघटनांनी विद्यार्थांना नोंदणी करण्यापासून रोखले होते. नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना धमकावले जात होते, असं डीसीपी टिर्की यांनी म्हटलं आहे. रविवारी झालेल्या हिंसाचारच आत्तापर्यंत हिंसाचाराचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं नाही. मात्र व्हायरल झालेल्या व्हिडिओंवरुन आम्ही काही आरोपींची ओळख पटवली आहे. यासंदर्भात आम्ही आत्तापर्यंत ३० ते ३२ साक्षीदारांशी चर्चा केली आहे असंही जॉय टिर्की यांनी स्पष्ट केलं.

 

 

Leave a Comment