धनंजय मुंडे यांचा कमबॅक!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । सत्तासंघर्षाच्या गदारोळात सकाळपासून नॉट रिचेबल असलेले राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीच्या ठरलेल्या बैठकीत उपस्थित झाले आहेत. यशवंतराव चव्हाण सभागृह येथे आमदारांची बैठक योजित केली आहे. या बैठकीत सध्याच्या बिकट परिस्थितीवर चर्चा होत आहे. त्यामुळं सकाळपासून धनंजय मुंडे यांच्या अज्ञातवासात गेल्याने संशयाचं वातावरण तयार झालं होत. मात्र, आता धनंजय मुंडे बैठकीच्या ठिकाणी अचानक उपस्थित झाले असून. यशवंतराव चव्हाण सभागृहाबाहेर मोठ्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित आहेत. ही बैठक संपल्यावर मुंडे नेमकी काय प्रतिक्रिया देणार यावर आता सर्वांचं लक्ष लागून आहे.

दरम्यान सकाळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षातून बंड करत देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन राज्यातील राजकारणात मोठा ट्विस्ट आणला आहे. त्यातच अजित पवार आपल्या समर्थक गटासोबत भाजपबरोबर सत्तास्थापना करणार आहेत अशी शक्यता तयार झाली आहे. त्यातच धनंजय मुंडे यांच्या संशयास्पद वागणं या परिस्थितीला खतपाणी घातलं गेलं होत.

Leave a Comment