दिग्विजय सिंह यांचे बेंगलोरमध्ये उपोषण ; पोलिसांनी घेतले ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस नेता दिग्विजय सिंह बंगळुरूमध्ये रामदा हॉटेलच्या समोर उपोषणाला बसले आहेत. ते काँग्रेसच्या २१ आमदारांना भेटायला गेले होते. मात्र पोलीस त्यांना आमदारांना भेटण्यासाठी हॉटेलमध्ये सोडत नसल्याची माहिती मिळाली आहे. पोलीस ते तिथून जाण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र दिग्विजय सिह तिथून निघायचं नाव घेत नसल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि अहेतियातन हिरास्टिन मध्ये ठेवल आहे.

पोलीस मला या आमदारांना भेटू देत नाहीत. मी मध्यप्रदेशचा राज्यसभा उमेदवार आहे त्यामुळे मला या आमदारांना भेटणं खूप गरजेचं आहे. कारण २६ मार्च ला मतदान आहे. माझ्या आमदारांना इथं ठेवण्यात आलं आहे आणि आता त्यांना भेटून पण दिल जात नाही. त्यामुळे मला पोलिसांकडून खूप त्रास दिला जात आहे. असं दिग्विजय यांनी सांगितलं. या प्रकाराने मध्यप्रदेश एक राजकीय वादळ निर्माण झाले आहे.

मध्य प्रदेशातील काँग्रेस आमदारांनी एकगठ्ठा राजीनामे दिल्याने कमलनाथ सरकार अडचणीत आले आहे. आज या सरकारची बहुमत चाचणी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर बंगळुरूत असलेल्या या बंडखोर आमदारांची भेट घेण्यासाठी काँग्रेसचे वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह तिथे पोहोचले.

Leave a Comment