डोनाल्ड ट्रम्प सुद्धा रिपब्लिकन पार्टीचेच; रामदास आठवलेंची कोपरखळी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर

केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकारांनी आठवलेंना विविध प्रश्नांवर छेडले असता त्यांनी महाविकास आघाडी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याबाबत मिस्किल भाष्य केलं.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याबाबत रामदास आठवले यांना विचारला असता ते म्हणाले, ”काँग्रेसच्या काळात अमेरिकेचे पंतप्रधान आले होते. त्यामुळं काँग्रेसने आता टीका करू नये, आपल्या देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी हा दौरा आवश्यक आहे. पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवादी अड्डे आता उध्वस्त होतील. भारताला मदत करण्यासाठी ट्रम्प भारतात आलेत. असं आठवलेंनी यांनी पत्रकारांना सांगितलं.

दरम्यान, ‘ट्रम्प पण रिपब्लिकन पार्टीचे आहेत, मी पण त्याच पक्षाचा अध्यक्ष आहे’ अशी कोपरखळी आठवलेंनी मारताच एकच हशा पिकाला. महाविकास आघाडीबाबत खासदार नारायण राणे यांनी राज्यातील सरकार फार काळ टिकणार नाही असं म्हटलं होत. त्यावर आठवले यांची प्रतिक्रिया पत्रकारांनी विचारली असता ”राणे म्हणत असतील तर हालचाली असतील पण ३ पक्षांत अजिबात एकमत नाही खरं. हे सरकार फार काळ टिकणार नाही असं’ अशी प्रतिक्रिया आठवले यांनी दिली.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment