पावसामुळे महाविद्यालयीन परीक्षा पुढे ढकलल्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | रात्रभरापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे वाहतुकीवर पावसामुळे परिणाम झाला आहे तर शाळा, महाविद्यालयांनाही आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई विद्यापीठ संलग्न सर्व महाविद्यालयाना सुट्टी जाहीर करण्यात आल्यामुळे ज्या महाविद्यालयांच्या परीक्षा आज होणार आहेत, त्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, त्या परीक्षेचे नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे.

राज्य शासनाकडून मुंबईसह तीन जिल्ह्यात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता राज्य शासनाने आज मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि ठाणे या तीन जिल्ह्यांमध्ये सुट्टी जाहीर केली असून अत्यावश्यक सेवा सुरू राहतील असं सांगितले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या –

मुसळधार पावसामुळे मुंबईला जाणार्‍या या रेल्वेगाड्या रद्द…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांच्या घरात गुडघाभर पाणी…पहा फोटो

मुसळधार पावसामुळे शाळेची भिंत कोसळली, तिघांचा मृत्यू

मालाडमध्ये मुसळधार पावसामुळे भिंत कोसळून 18 जणांचा मृत्यू

टोल फ्लाझ्याची सफाई करण्याऱ्या कर्मचाऱ्याला ट्रकने चिरडले

Leave a Comment