अमरावतीमधील ‘पोकरा’ तील कामांची जिल्हाधिका-यांकडून पाहणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज चांदूर रेल्वे तालुक्यातील लालखेड येथे भेट देऊन नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतील (पोकरा) कामांची पाहणी केली. तसेच या योजनेतील लाभार्थ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

जिल्हाधिका-यांनी आज लालखेड येथील शेतकरी मानसिंग हरिदास राठोड यांच्या शेतात जाऊन संत्रा फळबाग लागवड पाहणी केली, तसेच योजनेत समाविष्ट ठिबक व तुषार सिंचन योजनेची पाहणी केली. गावातील मृदसंधारणाची कामांची पाहणी त्यांनी केली.  यावेळी जिल्हाधिका-यांनी वैयक्तिक लाभार्थ्यांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.

चांदूर रेल्वे तालुक्यातील  पांदण रस्त्यांची पाहणीही जिल्हाधिका-यांनी केली. पांदण रस्त्यांची प्रलंबित कामे पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रयत्न व्हावेत, असे निर्देश त्यांनी दिले. याप्रसंगी तहसीलदार संदीप इंगळे, तालुका कृषी अधिकारी श्रीमती जाधव आदी उपस्थित होते.

Leave a Comment