गोपीचंद पडळकर पुन्हा भाजपच्या वाटेवर ; वंचितच्या अडचणी वाढल्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतिनिधी | आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीदेखील कंबर कसली आहे . पण लोकसभा निवडणुकीत वंचितकडून सर्वाधिक मतं घेतलेल्या गोपीचंद पडळकर वंचितपासून काहीसे अलिप्त झाल्याची चर्चा आहे. पडळकर भाजपमध्ये जातील, अशी शक्यता गेल्या काही दिवसांपासून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे चित्र आहे .

युती झाल्यास मिळणार २०५ जागा ; तर स्वतंत्र लढल्यास भाजप स्वबळावर सरकार स्थापन करणार

पडळकर वंचितच्या प्रमुख कार्यक्रमांना गैरहजर राहत असल्याने या त्यांच्या पक्षबदलाच्या चर्चांना आणखीनच बळ मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांमध्ये सर्वाधिक मते घेणारा आणि पश्चिम महाराष्ट्रात लोकप्रिय असलेला गोपीचंद पडळकरांसारखा नेता पक्षापासून दूर होत असल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीची डोकेदुखी वाढली आहे .

गटबाजी चव्हाट्यावर : शरद पवारांची सभा संपताच राष्ट्रवादीच्या दोन गटात तुफान हाणामारी

दरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या चर्चेदरम्यान एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीतील दुफळी बाहेर येण्यास सुरूवात झाली. त्यानंतर सन्मानजनक जागा न दिल्याने एमआयएमने वेगळे होण्याचा निर्णय घेत युती तुटल्याची घोषणा केली होती.

Leave a Comment