कराडमध्ये तिसर्‍या दिवशीही 300 अतिक्रमणावर हातोडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । कराड नगरपालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तात सुरू केलेली शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम शुक्रवारी तिसर्‍या दिवशीही सुरु होती. या मोहिमेत नगरपालिकेने 300 अतिक्रमणावर हातोडा मारला.

शुक्रवारी नगरपालिकेनी अतिक्रमणविरोधी पथकाच्या दोन टीम तयार केल्या. यामध्ये कृष्णा नाका ते चावडी चौकपर्यंतच्या टप्प्यातील शेकडो अवैध बांधकामे आणि टपर्‍या हटवल्या. तर दुसर्‍या टीमने मंडई परिसरातील शेकडो अवैध बांधकामावर हातोडा चालविला. यावेळी काही नागरिकांनी अतिक्रमणविरोधी पथकाशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु ही मोहिम पोलीस बंदोबस्तात सुरु असल्यामुळे पालिकेच्या कर्मचार्‍यांनी कोणालाही अजिबात न जुमानता नोंद नसणार्‍या बांधकामांवर सरळ जेसीबी चालवून ती उद्धवस्त केली.

यामध्ये दिवसअखेर सुमारे तीनशे अतिक्रमणे हटवण्यात आली. शहरातील मुख्य मार्गासह अंतर्गत रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांसह व्यावसायिक, दुकानदार, हातगाडे, चायनिज गाडेवाल्यांनी अतिक्रमणे केल्यामुळे शहरात वाहतूक कोंडीचा प्रश्न जटील बनला आहे. याबाबत स्वत: जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुखांनीही नाराजी व्यक्त केली होती. शहरात वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रथम अतिक्रमणे हटवणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार मुख्याधिकारी यशवंत डांगे, अभियंता ए. आर. पवार, आर. डी. भालदार आदींनी शहरातील अतिक्रमणाचा सर्वे करून आराखडा तयार केला.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment