UPSC साठी चालु घडामोडी चा अभ्यास कसा/का करायचा…?? 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्पर्धापरिक्षा अभ्यासनीती, भाग 27 | नितिन बऱ्हाटे

असंख्य घडामोडी आपल्या आजुबाजूला घडत असतात आणि आपण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या त्याचे साक्षीदार असतो, या घडामोडी आपल्या आयुष्यावर कमी-जास्त प्रमाणात कायम परिणाम करीत असतात. या “चालु घडामोडी मागील भुतकाळ आणि त्यांचा भविष्यकाळ आपल्या जगण्याचा वर्तमान असतो”. भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी भुतकाळाच्या प्रभावी हाताळणीतुन कार्यक्षम वर्तमान आपल्याला दररोज उभा करायचा असतो

UPSC,MPSC, SSC अशा प्रत्येक‌ शासकीय स्पर्धापरिक्षेसाठी चालु घडामोडी या घटकांवर प्रश्र्न विचारले जातात.UPSC मध्ये समकालीन घटनांना विशेष महत्त्व आहे ,त्यामुळे चालु घडामोडी हा स्पर्धापरिक्षेच्या तयारीचा अविभाज्य भाग असतो
सदर लेखात आपण UPSC साठी विचारल्या जाणाऱ्या चालु घडामोडीचा अभ्यास कसा/का करायचा हे पाहु,

“UPSC मध्ये चालु घडामोडी हा सामान्य अध्ययन च्या अभ्यासाचा आत्मा असतो” कारण सामान्य अध्ययन पेपर मध्ये विचारलेला प्रत्येक प्रश्नाला चालु घडामोडीची पार्श्वभुमी असते याउलट सकारात्मक रित्या पाहिले तर “चालु घडामोडी” सामान्य अध्ययन च्या अभ्यासाला दिशा देण्याचे महत्त्वाचे कार्य करतात म्हणजेच चर्चेत असलेल्या एखाद्या घटनेवर सामान्य अध्ययनच्या एखाद्या बेसिक संकल्पने वर प्रश्न विचारले जातात उदाहरणार्थ
१. मे 2017 मध्ये नवीन बांधकाम झालेल्या किशनगढ विमानतळच्या सजावट म्हणुन भींतींवर “बनी-ठणी पेन्टींग्स” चितारल्या गेल्या आणि UPSC जुन 2018 पुर्व परिक्षेत या चित्रशैलीवर(विषय-कल्चर) प्रश्र्न विचारला गेला.
२. प्रोसोपीस ज्युलिफ्लोरा(Prosopis juliflora) ही वनस्पती चर्चेत होती जी ज्या प्रदेशात वाढते त्या प्रदेशाची जैवविविधता(पर्यावरण विषय) कमी करते तीच्या बद्दल विचारले गेले.
३. अरुणाचल प्रदेश मधील bugun जमातीच्या कार्यासाठी 23 मे ला 2018 चा जैवविविधता पुरस्कार मिळाला होता आणि जुन 2018 UPSC पुर्व परिक्षेत अरुणाचल प्रदेश मधील Pakhui wildlife sanctuary वर प्रश्र्न विचारला गेला.
इत्यादी चालु घडामोडी आणि GS संबंधित अनेक उदाहरणे देता येतील .

GS चे बाकीचे घटक आहेत त्यांच्याशी चालू घडामोडी जोडून घ्यायची सवय लावावी लागेल उदा. भूगोल व चालू घडामोडी, इतिहास व चालू घडामोडी इत्यादी

“UPSC पुर्व 2019 परिक्षेचा अभ्यास चालू घडामोडींचे घटक आणि त्याचा GS मधील बेसिक संकल्पना यांच्या जोडणीत केला तरी खुप चांगला स्कोर येऊ शकेल.”

चालु घडामोडींच्या तयारींसाठी पुढील तीन माध्यमे आहेत
1.मुद्रीत साहित्य (Print Material)-वृत्तपत्र, मासिक, शासकीय आणि संस्था अहवाल, धोरण इत्यादी.‌ चालु घडामोडी साठी सर्वात प्रभावी आणि अनिवार्य माध्यम असुन “द हिंदू” किंवा “द इंडियन एक्स्प्रेस” ही वृत्तपत्रे वाचायला पाहिजेत
2.व्हिडीओ – राज्यसभा बीग पिक्चर (चालु घडामोडी वर चर्चा)
3. आॅडिओ – AIR news, Spotlight, Samsamayiki,etc.
4. ऑनलाईन स्त्रोत – pib.nic.in, Ministries websites

“दररोजचे वृत्तपत्र बारकाईने वाचुन mindmaps पद्धतीमध्ये नोट्स काढुन ठेवणे” हा चालु घडामोडी पुर्ण करण्याचा सर्वात्तम मार्ग आहे.मात्र त्यात सातत्य खुप महत्वाचे आहे. बाकी दुर्लक्षित झालेल्या घडामोडी मासिकांमधुन नंतर पुर्ण करता येतील .

दररोजच्या वृत्तपत्रांमध्ये नेमके काय काय वाचायचे ?
1.शासनासंबधी, शासननिर्णय,धोरण, योजना, संस्था ,अहवाल इत्यादी संबंधित सर्व बातम्या
2.सर्वाच्च न्यायायल, उच्च न्यायालया मधील नवीन निर्णय, सुनावणी, जुन्या खटल्यातील दुरुस्ती, संविधानिक बदल, हक्क आणि इतर न्यायालयीन प्रक्रिया.
3.राजकिय संस्था आणि पद्धती समजुन घेणा-या राजकीय घडामोडी. भारताचे परकीय देशांशी हितसंबंध आणि व्यवहार, राजनय इत्यादी.
4.विविध हक्क आणि कायदे उदा. RTI, Sec66A, IPC 377, Right to privacy, RTE etc.
5.राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्था, मंच किंवा मंडळांचे महत्त्वाचे अहवाल ex. NITI aoyg, UN, WHO, WEF, UNDP etc.
6.आंतराष्ट्रीय संस्था,गट किंवा समुहांच्या प्रक्रिया, करार, निर्णय इत्यादी. ex. SARC, G20 etc.
7.नवीन आर्थिक घडामोडी, संकल्पना, चर्चा, आर्थिक शाश्वत विकास, निर्देशांक इत्यादी.
8.विज्ञानातील संशोधन, तंत्रज्ञानातील प्रगती आणि मानवी जगणं सुसह्य करणार्या सृजनात्मक तांत्रिक घडामोडी.
9. पर्यावरण मुळ संकल्पना, वातावरणीय बदल, जैवविविधता,जैवसंवर्धन, पर्यावरणीय संकट निर्माण झालेले मुद्दे आणि शाश्वत पर्यावरणाचे उपाय .
10.सर्वसमावेश समाजावर मोठ्या प्रमाणावर प्रभावित करणार्या सर्व संक्लपना, समस्या,, कारणे किंवा उपक्रम इत्यादी.
वरील प्रत्येक घडामोडी कडे वृत्तपत्र वाचताना लक्ष असले पाहिजे.

कोणत्याही विशिष्ट घटकाचा “बातमी>विस्तृत बातमी>विस्तृत संपादकीय>प्रतिचर्चात्मक लेख>अद्ययावतीकरण ” असा प्रवास असतो . असे घटक मुख्य परिक्षेसाठी विशेष महत्त्वाचे असतात.
”द हिंदू” सारखी वृत्तपत्रे घडामोडींचा घटनाक्रम(series of events)असतो त्यामुळे त्यांच्या वाचनात सातत्य असणे अनिवार्य आहे. नियमित वाचनाचा सराव ठेवला तरच चालु घडामोडीचा प्रवाह कायम ठेवता येतो त्यांच्याबरोबर इंग्रजी शब्दसामग्री आणि आकलन यांतही सुधारणा होते.

10 Golden Stages To Read a particular current News-
1.बातमी नीट वाचुन समजुन घ्या
2. यूपीएससी अभ्यासक्रमातील माहिती, अभ्यासक्रम कीवर्ड यांच्याशी जोडण्याचा प्रयत्न करा.उदा. शासकीय धोरणे, गुंतवणूक प्रारुप, सचोटी इ.
3.सबंधित घटनेला चतुरस्त्र परिप्रेक्षातुन विचार करा शक्य त्या बाजुने Wh प्रश्नांची उत्तरे शोधुन घ्या.
4.घटनेच्या सकारात्मक बाबी शोधा
5.नकारात्मक बाबींचा विचार करा
6.सर्वप्रथम संबंधित बाबीचा mindmap तयार करुन फ्लोचार्ट पद्धतीने नोट्स मध्ये नमुद करुन ठेवा
7.संबंधित घटनेबाबत ‌तज्ञांची मते लक्षात घ्या,त्यावर विश्लेषण चालु राहुद्या
8.उपलब्ध स्त्रोताद्वारे आपलेही त्यावर मत तयार करुन ठेवा, शक्य उपाययोजना नोंदवून ठेवा
9. चर्चेतील घटक, यु.पी.एस.सी.चा अभ्यासक्रम, मागील प्रश्न याआधारे संबंधित घटकांवर विचारल्या जाणारे शक्य प्रश्नांबाबत(पुर्व आणि मुख्य परिक्षेला) अंदाज बांधता आल्यास उत्तम.
10. संबंधित बातमी/घटकावर नंतर झालेले बदल अद्ययावतीकरण नोंदवुन ठेवा. दररोजच्या घडामोडींसोबत मागील घटकांचीही उजळणी करीत रहा.

एक सक्षम अधिकारी म्हणुन आपल्याला अनेक घटना आणि जटिल घटकांची सोडवणुक करण्याचे आव्हान कायम असते, त्याच्याशी झगडण्यासाठी आपल्याला परिप्रेक्ष(Perspective) वृद्धिंगत करावा लागतो, दैनंदिन घटना, उदाहरणे,अनुभव, सिद्ध थिअर,प्रात्याक्षिके, विचार, सांख्यिकी, सामग्री आणि‌ उपलब्ध स्त्रोत यांच्या आधारेच हा परिप्रेक्ष तयार होतो ज्यातुन समस्येची सोडवणूक करता येते म्हणुन परिप्रेक्ष प्रगतीसाठी चालु घडामोडी आवश्यक आहे

लोकल ते ग्लोबल, इंडंस्ट्री आणि इंटरनेटमुळे वेगात होणारे इंटेलेक्चुअल आणि इमोशन बदल समजुन घेण्यासाठी चालु घडामोडींचा अखंड प्रवाह आपण पकडला तरच आपण सामाजिक बांधिलकी असलेले समाजभान निर्माण करुन समाजस्वास्थ टिकविण्याची जाणीव आपल्या कृतीतून दिसत राहील त्यासाठी चालु घडामोडींवर मजबुत पकड असणे अपरिहार्य आहे.

#बाकी_”Your Everyday Efforts is the only salvation to current affairs preparation”

Nitin Barhate UPSC MPSC

नितिन ब-हाटे
9867637685
(लेखक’लोकनीति IAS, मुंबई’ चे मुख्य समन्वयक असुन स्पर्धापरिक्षा मार्गदर्शक आहेत)

इतर महत्त्वाचे
“2019 ची UPSC प्रिलिम देणार्यांसाठी मन कि बात…???”
https://bit.ly/2MJEWf9

“2019 ची UPSC प्रिलिम पास होण्यासाठी पहिली वार्निंग…!”
http://bit.ly/2OBJDMh

“UPSC/MPSC साठी क्लास लावु की नको…?”
https://bit.ly/2Qi4bJV

UPSC/MPSC साठी राज्यव्यवस्थेचा अभ्यास कसा करायचा…..??”
http://bit.ly/2A4njlb

Leave a Comment