करोनापासून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी मी कुठल्याही थराला जाईल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । करोनाशी दोन हात करताना आणखी एक व्हायरस समोर येतो आहे. तो म्हणजे समाजात दुही माजवण्याचा. काही लोक दुही माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशांना मी सोडणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. करोनापासून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी मी कुठल्याही थराला जाईल. तेव्हा दुहीचा आणि अफवांचा व्हायरस पसरवणाऱ्यांना माफ करणार नाही. त्यांच्यावर कारवाई होणारच असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला. आज त्यांनी महाराष्ट्रातील जनतेशी फेसबुकद्वारे संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. कोरोनाच्या या लढाईत काही विकृती समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. या दरम्यान फेक व्हिडीओ पाठवणाऱ्यांची गय केली जाणार नाही. महाराष्ट्राच्या एकीला गालबोट लावू नका, असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

यावेळी पुढच्या सूचना येईपर्यंत महाराष्ट्रात कुठलाही उत्सव साजरा करता येणार नाहीत, असे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले. महाराष्ट्रात अनेक जत्रा, उत्सवांचं आयोजन रद्द करण्यात आलं. तसंच सर्वांनी ते करावं, असंही ठाकरे यावेळी म्हणाले. तबलिगींचा कार्यक्रम आम्ही महाराष्ट्रात होऊ दिला नाही. दिल्लीवरुन मरकजमधून आलेले १०० टक्के लोक सापडले आहेत. या सर्वांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आलं आहे, असं ठाकरे यांनी सांगितलं.

राज्यात अडकलेल्या परप्रांतियांची आम्ही सोय केली आहे, त्यांनी घाबरुन जाऊ नये, असंही ठाकरे म्हणाले. तसेच परराज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील मजूर, कामगारांनी काळजी घ्या, जिथं असाल तिथं थांबा, तुमची सोय केली जाईल, असंही ते म्हणाले. महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढते आहे. जगभर धुमाकूळ या व्हायरसने घातला आहे. या केसेसमध्ये आपण रुग्ण चाचण्यांची संख्या वाढवली आहे. त्यामुळे ही संख्या वाढते आहे. काळजी करु नका कारण ५१ लोकांना घरी पाठवण्यात आलं आहे हेदेखील लक्षात घ्या असंही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

चिंता वाढली! देशातील करोनाग्रस्तांचा आकडा २९०० पार, ६८ जणांचा मृत्यू

अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार, २४ तासात १४८० जणांचा मृत्यू

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

राज्यातील लॉकडाउन काही आठवडे आणखी लांबणार?; राजेश टोपेंनी दिले संकेत

मरकजच्या लोकांना गोळ्या घातल्या पाहिजे, उपचार कसले करता – राज ठाकरे

करोनापासून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी मी कुठल्याही थराला जाईल- मुख्यमंत्री ठाकरे

Leave a Comment