बुमराहच्या टीकाकारांना इशांतचे चोख प्रत्युत्तर !!!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्मा हा सध्या संभ्रमित झाला आहे.गेल्या दोन वर्षांपासून जबरदस्त कामगिरी करत असलेल्या जसप्रीत बुमराहच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करून त्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याच्या मनोवृत्तीमुळे आश्चर्यचकित झाला आहे. भारताकडून जास्त कसोटी सामने खेळलेल्या या अनुभवी वेगवान गोलंदाजाणे त्याचा साथीदार मोहम्मद शमीप्रमाणेच बुमराहच्या टीकाकारांना प्रत्युत्तर दिले.

इशांतने आपल्या जोडीदाराची बाजू मांडताना विचारले, “एक खेळीनंतर मत बदलत असते आश्चर्यकारक आहे.” गेल्या दोन वर्षांपासून, आम्ही नेहमीच 20 विकेट्स घेतल्या आहेत, मी, बुम (ड्रेसिंग रूममध्ये बुमराहचे टोपणनाव) आणि शमी, अ‍ॅश किंवा जाड्डू. एका खराब कसोटी सामन्याच्या आधारे लोक प्रश्न कसे विचारू शकतात? “

तो म्हणाला, “मला असे वाटत नाही की कोणालाही बुमच्या क्षमतेवर शंका आहे.” पदार्पणानंतर त्याने भारतासाठी जे काही साध्य केले आहे, त्याबद्दल कुणीही प्रश्न उपस्थित करावे असे मला वाटत नाही”.बुमराहला गेल्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये विकेट न मिळण्याविषयी विचारले असता शमीनेही असेच म्हटले होते.

Leave a Comment