जे.पी. नड्डा भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जगत प्रकाश नड्डा यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. भाजपाच्या राष्ट्रीय निवडणूक समितीचे प्रमुख राधामोहन सिंग यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. जे. पी. नड्डा यांच नाव आधीपासूनच जवळपास निश्चित झालं होतं. त्यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणा बाकी राहिली होती.

भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पक्षाचे निवडणूक प्रभारी राधामोहन सिंह यांना नड्डांचे नाव सुचवले होते. यामुळे नड्डा यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड होईल, असं सांगण्यात येत होतं. अमित शहा यांनी गृहमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नड्डा हे भाजपचे कार्यकारी अध्यक्ष झाले होते. लोप्रोफाइल असलेले आणि वादग्रस्त ववक्त्यांपासून दूरच राहणारे अतिशय प्रभावी नेते, अशी नड्डांची ओळख आहे.

जे.पी. नड्डा यांची राजकीय कारकीर्द

विद्यार्थी आंदोलनातून पुढं आलेले नड्डा हे आरएसएसच्या जवळचे मानले जातात. मूळचे हिमाचल प्रदेशातील असलेल्या नड्डा यांच्याकडं संघटनात्मक कामाचा मोठा अनुभव असून स्वच्छ प्रतिमा ही त्यांची जमेची बाजू आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्यावर उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपनं सपा आणि बसपाच्या आघाडीचा आव्हान परतवून लावत ८० पैकी ६२ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यात नड्डा यांना भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. नड्डा हे मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात मंत्री होते. भाजपचे महत्त्वपूर्ण निर्णय घेणाऱ्या संसदीय बोर्डात ते सदस्य देखील होते.

ताज्या बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आजच आमच्या 8080944419 या नंबरवर Whatsapp करा आणि लिहा ”Hello News”