कोल्हापूरात बनावट रुग्णांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका पोलिसांनी पकडली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी। सतेज औंधकर
संपूर्ण राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. असे असताना कोल्हापूरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क रुग्णवाहिकेतून बनावट रुग्ण घेऊन जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. कोल्हापूरातील पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर किणी टोलनाक्यावर हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. त्यानंतर पोलिसांनी रुग्णवाहिकेतून प्रवास करणाऱ्या ८ जणांसह रुग्णवाहिका ताब्यात घेतली आहे.

पोलिसांना रुग्णवाहिकेतून प्रवासी वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार किनी टोल नका येथे पोलिसांनी ही कारवाई केली. एवढेच नव्हे तर त्या ८ जणांना वर आणि रुग्णवाहिका चालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वडगाव पोलिसांनी सुरू केली आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment