काँग्रेसची पहिली यादी झाली लीक ; यादीत आहेत या बड्या नेत्यांची नावे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | काँग्रेस पक्षाची महत्वाची बैठक शुक्रवारी सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली यासाठी पार पडली. या बैठकीसाठी बाळासाहेब थोरात नवी दिल्लीला गेले होते. त्यांनी आमची ४५ जागांवर चर्चा झाल्याचे म्हणले आहे. त्याच प्रमाणे एकूण ८५ जागांचे उमेदवार निश्चित झाले आहेत. त्याच प्रमाणे १५० जागी निवडणूक लढण्यास आमचा पक्ष सक्षम आहे. मात्र काही जागा आमच्या मित्र पक्षाला सोडाव्या लागणार आहेत असे थोरात म्हणाले आहेत.

दरम्यान काँग्रेसची पहिली उमेदवारी नवरात्रीच्या उत्सवास आरंभ झाल्यावर प्रदर्शित केली जाईल असे बोलले जात असतानाच हि यादी लीक झाली आहे. या यादीत जुन्याच आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर माजी मुख्यमंत्री आणि नांदेड मधून लोकसभा निवडणुकीला पराभूत झालेले अशोक चव्हाण यांना पक्षाने भोकर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. त्या ठिकाणी त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण या सध्या आमदार आहेत.

काँग्रेसची लीक झालेली उमेदवार यादी

बाळासाहेब थोरात (संगमनेर )

अशोक चव्हाण (भोकर)

विजय वडेट्टीवार (ब्रम्हपूरी)

डी. पी. सावंत (नांदेड)

वसंत चव्हाण (नायगाव, नांदेड)

अमीन पटेल (मुंबादेवी)

वर्षा गायकवाड (धारावी)

भाई जगताप (कुलाबा)

नसीम खान (चांदीवली)

यशोमती ठाकूर (तिवसा)

के. सी. पडवी (अक्कलकुवा)

संग्राम थोपटे ( भोर )

संजय जगताप (सासवड)

वीरेंद्र जगताप (धामनगाव)

सुनील केदार (सावनेर)

अमित देशमुख (लातूर)

बसवराज पाटील (औसा)

विश्वजित कदम (पलूस-कडेगाव )

प्रणिती शिंदे (मध्य-सोलापूर)

Leave a Comment