शीतलहरींमुळे महाराष्ट्र गारठला; नाशिकमध्ये सर्वात नीचांकी तापमानाची नोंद

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम हॅलो महाराष्ट्र । संक्रांतीनिनंतर राज्यभर थंडीचा जोर वाढला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या शीतलहरींमुळे महाराष्ट्रात कमी तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईतही तापमान १४.५ अंशांपर्यंत घसरले असून हा मुंबईत थंडीचा १० वर्षांमधील विक्रमी निचांक आहे. तर नाशिकमधील निफाड येथे राज्यातील २.४ इतक्या सर्वात निचांकी तापमानाची नोंद आहे. विशेष म्हणजे काल निफाडमध्ये ९.४ अंश सेल्सियस इतके तापमान होते. काही तासांमध्येच पारा तब्बल ७ अंशांनी घसरला आहे.

नाशिकमधील निफाडनंतर धुळ्यामध्ये सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. धुळ्यामध्ये पारा ५ अंशाहून खाली घसरले आहे. मुंबईत कुलाबा येथे १४.५ इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली असून सांताक्रुझ येथे ११. ४ अंश सेल्सियस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे.

हिवाळा सुरू झाल्यानंतर मुंबईत थंडी जाणवत नव्हती. मात्र गेल्या ४ दिवसांपासून मुंबईचे तापमान घसरण्यास सुरुवात झाली. काल पासून मात्र मुंबईचा पारा जलद गतीने घसरण्यास सुरूवात झाली. मुंबईत सुरू झालेली थंडी १७ जानेवारीपर्यंच तशीच राहीस असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.

Leave a Comment