अब्दुल सत्तारांना ग्रामविकास तर बच्चू कडूंना शालेय शिक्षण व कामगार; पहा संपूर्ण खातेवाटप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | कृषी खाते कोणाकडे जाणार यावरून काँग्रेस व शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू होती. अखेर कृषी खाते शिवसेनेकडे गेले आणि शिवसेनेचे दादा भुसे कृषी मंत्री झाले. खाते वाटपा संबंधी अधिकृत घोषणा झाली नसली तरी सूत्रांकडून मिळालेली यादी अंतिम मानली जात आहे. अजित पवार आणि जयंत पाटील यांना कोणते खाते मिळाले हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी अर्थ व नियोजन अजित पवार यांच्याकडे तर जलसंपदा खाते जयंत पाटील यांच्याकडे देण्यात आले आहे.

 

 

पहा खातेवाटप

काँग्रेस

बाळासाहेब थोरात – महसूल
अशोक चव्हाण – सार्वजनिक बांधकाम
नितीन राऊत – ऊर्जा
विजय वड्डेटीवार – ओबीसी ,खार जमिनी,मदत आणि पुनर्वसन
के.सी.पाडवी – आदिवासी विकास
यशोमती ठाकूर – महिला व बालकल्याण
अमित देशमुख – वैद्यकीय शिक्षण आणि सांस्कृतिक
सुनील केदार – दुग्ध विकास व पशुसंवर्धन
वर्षा गायकवाड – शालेय शिक्षण
अस्लम शेख – वस्त्रोद्योग,मस्तव्यवसाय, बंदरे
सतेज पाटील – गृह राज्यमंत्री (शहर)
विश्वजित कदम – कृषी आणि सहकार राज्यमंत्री

शिवसेना

एकनाथ शिंदे – नगरविकास
सुभाष देसाई – उद्योग
उदय सामंत – उच्च तंत्र शिक्षण
आदित्य ठाकरे – पर्यटन, पर्यावरण
अनिल परब- परिवहन, संसदीय कामकाज
शंकरराव गडाख – जलसंधारण
संदिपान भुमरे – रोजगार हमी
गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
दादा भुसे – कृषि
संजय राठोड – वने
शंभूराज देसाई – गृहराज्यमंत्री (ग्रामीण)
अब्दुल सत्तार – महसूल, ग्रामविकास
बच्चू कडू – जलसंपदा, शालेय शिक्षण, कामगार
राजेंद्र यड्रावकर- आरोग्य, सांस्कृतिक, अन्न औषध प्रशासन राज्यमंत्री

राष्ट्रवादी

जयंत पाटील – जलसंपदा
अजित पवार – वित्त व नियोजन
अनिल देशमुख – गृहमंत्री
छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा
दिलीप वळसे पाटील- राज्य उत्पादन शुल्क, कामगार
बाळासाहेब पाटील – सहकार
राजेश टोपे- आरोग्य
जितेंद्र आव्हाड – गृहनिर्माण
धनंजय मुंडे – सामाजिक न्याय
राजेंद्र शिंगणे – अन्न व औषध प्रशासन
हसन मुश्रीफ – ग्रामविकास
दत्ता भरणे – जलसंधारण, सामान्य प्रशासन राज्यमंत्री
अदिती तटकरे – उद्योग, पर्यटन, क्रीडा राज्यमंत्री
संजय बनसोडे – पर्यावरण, पाणीपुरवठा , सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री
प्राजक्त तनपुरे – राज्यमंत्री नगरविकास, उर्जा, उच्च तंत्र शिक्षण

महाराष्ट्रच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकिंग बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 8080944419 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा Hello News