मुलींच्या लग्नाचे कमीतकमी वय 18 वरून 21 होणार?, केंद्र सरकार लवकरच निर्णय घेण्याच्या तयारीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मोदी सरकार मुलींच्या लग्नाचे कमीतकमी वय 18 वरून 21 करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. माता मृत्यू कमी करणे या मागील उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गेल्या आठवड्यात आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले होते की, महिलांना आई होण्याच्या योग्य वयाविषयी सल्ला देण्यासाठी एक टास्क फोर्स तयार करण्यात येईल. सरकारच्या या विचारामागे सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. सध्या मुलीच्या लग्नाचे किमान वय 18 वर्षे व मुलासाठी 21 वर्षे आहे.

काय आहे प्रकरण?

ऑक्टोबर 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा सरकारच्या या विचारास कारणीभूत ठरू शकतो. मुलींना वैवाहिक बलात्कारापासून वाचविण्यासाठी बालविवाह पूर्णपणे बेकायदेशीर ठरवले पाहिजे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाने लग्नासाठी किमान वय निश्चित करण्याचा निर्णय सरकारवर सोडला आहे. दुसरीकडे असे म्हणले जात आहे की जर आई होण्याचे कायदेशीर वय 21 वर्षे निश्चित केले गेले असेल तर एखाद्या महिलेचे अपत्य जन्माला घालण्याची क्षमता कमी होईल.

युनिसेफच्या आकडेवारीनुसार, भारतातील 27 टक्के मुलींचे लग्न 18 व्या वर्षाच्या आधीच होते तर 7 % मुलींचे लग्न 15 वर्षांपूर्वीच होते.

भारतातील काही राज्ये आणि समुदायांमध्ये अजूनही बालविवाह सर्वसामान्य आहे. बाल विवाह रोखण्यासाठी कठोर कायदे भारतात आहेत. पण तरीही अशी प्रकरणे बर्‍याचदा पुढे येत असतात.

लग्नाच्या किमान वयाबाबत भारतात बरीच चर्चा सुरू आहे. ब्रिटिश काळात, लग्नासंदर्भात प्रथमच कायदे भारतात केले गेले. हे कायदे वेळोवेळी बदलण्यात आले आणि ते 21 व 18 वर्षे जुने असणार आहेत.

>> 1955 मध्ये नवीन हिंदू विवाह कायदा लागू करण्यात आला. हा कायदा हिंदूंसह जैन, बौद्ध आणि शीख यांनाही लागू होता. 2012 मध्ये शीखांसाठी स्वतःचे आनंद विवाह विधेयक लागू करण्यात आले. हिंदू विवाह कायद्यानुसार मुलाच्या लग्नाचे किमान वय 18 वर्षे आणि मुलीचे किमान वय 15 वर्षे होते.

पारशी विवाह कायद्यानुसार मुलाचे वय 18 आणि मुलीचे वय 15 वर्षे असावे.1978 मध्ये बाल विवाह कायद्यात सुधारणा करण्यात आली. यामध्ये मुलाचे विवाहाचे किमान वय 21 वर्षे आणि मुलीच्या लग्नाचे किमान वय 18 वर्षे होते. हा कायदा सर्व धर्मांना लागू आहे.

>> सन 2018 मध्ये विधी आयोगाने असा युक्तिवाद केला की लग्नाच्या वयातील फरक पती मोठा आणि पत्नी लहान असलेल्या रूढीला उत्तेजन देते. याचा कोणताही वैज्ञानिक आधार नाही.

Leave a Comment