मुंबईसाठी धोक्याची घंटा! सापडले नवे १० रुग्ण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी | राज्यावरील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ५२ वरुन ६३ वर गेला आहे. यामुळे आता सर्वत्र चिंतेचे वातावरण असून आता हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता आहे.

देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा २७९ वर पोहोचला आहे. देशात सर्वाधिक कोरोनारुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ५२ वरुन ६३ वर गेला आहे. यामध्ये मुंबईत १०, पुण्यात 1 नवीन रुग्ण सापडला आहे.

दरम्यान, नव्या रुग्णांपैकी परदेशातून आलेले 8 तर संसर्गातून तिघांना लागण झाल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यार तपासणी केंद्रांची संख्या आम्ही वाढवली आहे. जिल्हा प्रशासनाला योग्य ते आदेश दिले आहेत. नागरिकांनी घरात रहावं आणि संपर्क टाळावा असे आवाहन टोपे यांनी केले आहे.

Leave a Comment