दलाल, व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठीच सरकारनं कांदा निर्यात बंदी उठवली- राजू शेट्टी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सांगली प्रतीनिधी । कांदा निर्यात बंदी सरकारने उठवली या निर्णयाचे स्वागतच करतो, मात्र हा निर्णय एक महिन्याअगोदर घेतला असता तर शेतकऱ्यांचा फायदा झाला असता. केवळ व्यापारी आणि दलालांचा फायदा करण्यासाठीच हा निर्णय घेतला असल्याची घणाघाती टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केली. ते सांगली येथे बोलत होते. राजमती नेमगोंडा पाटील ट्रस्टच्यावतीने दरवर्षी दिला जाणारा राज्यस्तरीय नेमगोंडा पाटील जनसेवा पुरस्कार २०२० यावर्षी राजू शेट्टी यांना देण्यात आला यावेळी त्यांनी कांदा निर्यातीवर भाष्य केलं.

राज्यात तीन पक्षाचे सरकार सत्तेत आहे. निवडणुकीत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असे म्हणणारे तुटपुंजी कर्जमाफी करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नसल्याचा गर्भित इशारा राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment