देश संकटात असताना विरोधी पक्षाने सरकारला सहकार्य करण्याची महाराष्ट्राची परंपरा – रोहित पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर प्रतिनिधी | राष्ट्रीय संकटात विरोधी पक्षाने सरकारला सहकार्य करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. आताचे विरोधक थोडे विचलित झाल्यासारखे वाटतात असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले आहे.

थोडे सॅनिटायझर राखून ठेवा लाॅकडाउन संपल्यानंतर १०५ डोकी साफ करण्यासाठी त्याचा उपयोग करता येईल अशी विनंती अमोल मिटकरी यांनी केली होती. मिटकरी यांच्या सदर ट्विटला प्रतिक्रिया देत पवार यांनी आमले मत व्यक्त केले आहे. जेव्हा देशावर संकट आलेले असते तेव्हा विरोधी पक्षाने सरकारला सहकार्य करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. मात्र सध्याचा विरोधीपक्ष थोडा विचलित झाल्याचे दिसत आहे. पण तेही ही परंपरा पाळतील अशी मी आशा व्यक्त करतो अस पवार यांनी म्हटले आहे.

तसेच आपल्या अकोला जिल्ह्यासाठी सॅनिटायझर पाठवलं आहे ते आपल्यापर्यंत पोचलंच असेल असंही पवार यांनी म्हटले आहे. आघाडी सरकारच्या लोकप्रियतेने लष्कर -ए -देवेंद्र अस्वस्थ झाली आहे . काही धंदा न राहिल्याने फक्त्त टीका करणे हा आता  एकमेव धंदा शिल्लक आहे असे म्हणत मिटकरी यांनी आपले मत ट्विट केले होते. आता रोहित पवार यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”

या बातम्याही वाचा –

ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा – www.hellomaharashtra.in

Leave a Comment