‘आप’च्या विजयी वाटचालीवर प्रशांत किशोर यांनी मानले दिल्लीच्या जनतेचे आभार, म्हणाले…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । आम आदमी पार्टीने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत आघाडी घेतली असल्याने निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी ट्विट करून दिल्लीतील जनतेचे आभार मानले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षासाठी प्रशांत किशोर यांच्या आय-पॅक (I-PAC) कंपनीनं निवडणूक प्रचाराची धुरा सांभाळली होती.

दिल्लीतील जनतेचे आभार मानत प्रशांत किशोर यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “भारताच्या आत्म्याच्या रक्षणासाठी उभं राहिल्याबद्दल दिल्लीचे धन्यवाद!”

उल्लेखनीय बाब म्हणजे दिल्ली निवडणूक प्रचारादरम्यान बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्याशी झालेल्या संघर्षानंतर प्रशांत किशोर यांना जनता दल युनायटेडने (जेडीयू) त्यांना पक्षातून बाहेरचा रास्ता दाखविला होता. नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) यासह अनेक मुद्द्यांवर प्रशांत किशोर यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर टीका केली होती, त्यानंतर त्यांना पक्षातून काढून टाकले.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment