भारताबद्दल डोनाल्ड ट्रम्प म्हणाले ‘लव यू इंडिया’ कारण..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं भारतात जंगी स्वागत करण्यात आलं आहे. गुजरातमधील अहमदाबाद येथे ट्रम्प आल्यानंतर मोदींनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. यानंतर स्वातंत्र्यलढ्यातील महत्वाचं स्थान असलेल्या साबरमती येथील आश्रमात जात ट्रम्प यांनी पत्नी मेलेनिया यांच्यासोबत चरखाही चालवला. यानंतर ट्रम्प यांनी अहमदाबाच्या मोटेरा स्टेडियमचे उदघाटन केले. ट्रम्प यांच्या स्वागतासाठी आयोजित मोटेरावरील आयोजित कार्यक्रमात उपस्थित जनतेला संबोधित केलं. मोटेरा स्टेडियम खूपच भव्यदिव्य आहे. जगातील सर्वात मोठं मैदान असून खूपच सुंदर आहे. तसेच भारतानं दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभारी आहे, हा क्षण आमच्या आयुष्यभर लक्षात राहील. असं ट्रम्प आपल्या भाषणात म्हणाले.

आपल्या भाषणाची सुरुवात ट्रम्प यांनी नमस्ते म्हणत केली. यावेळी त्यांनी ‘मोदी ग्रेट चँपियन ऑफ इंडिया, ते माझे खरे मित्र आहेत’ असं म्हणतं मोदी यांचं कौतुक केलं. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधावर बोलताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिका भारताचा खरा मित्र आहे. तसेच अमिरेका नेहमीच भारताचा सन्मान करत आलेला आहे. प्रत्येक अमेरिकन नागरिक भारतीयांना पसंत आणि प्रेम करतोय. भारत आणि अमेरिकेची मैत्री आजपर्यंतची सर्वात दृढ मैत्री आहे. याआधी दोन्ही देशांत इतकी मैत्री दृढ नव्हती. ट्रम्प यांनी आपल्या भाषणात दिवाळी आणि होळी या भारतीय सणांचा उल्लेख केला. भारतामध्ये विविधतेत एकता आहे. येथील लोक जगात एक उदाहरण आहेत असंही ते यावेळी म्हणाले. तुम्ही आज दिलेला सन्मानाने भाराहून गेलो आहे. हा सन्मान प्रत्येक अमेरिकन नागरिकांच्या ह्रदयात राहिल. भारतानं दाखवलेल्या प्रेमाबद्दल आभारी आहे, हा क्षण आमच्या आयुष्यभर लक्षात राहील. गॉड ब्लेस इंडिया, गॉड ब्लेस अमेरिका, वी लव यू इंडिया, असे भाषणाच्या अखेरीस ट्रम्प म्हणाले.

अहमदाबादमधील नियोजित कार्यक्रम आटोपून डोनाल्ड ट्रम्प आग्र्यातील ताजमहाला भेट देणार आहेत. मिळालेल्या वृत्तानुसार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ २४ फेब्रुवारी रोजी आग्रा येथे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे स्वागत करतील. तसेच अमेरिकन राष्ट्रपतीना ताजमहाल भेटीत कंपनी देतील.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment