Breaking | पुण्यात कोरोनाचा पहिला बळी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुणे प्रतिनिधी । महाराष्ट्रात कोरोना संसर्गाचे हॉटस्पॉट बनलाय पुण्यात आज कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. पुण्यात एका ५२ वर्षीय व्यक्तीचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या मृत्यूनंतर राज्यातील कोरोनाच्या बळीची संख्या ८ वर गेली आहे. तर देशातील कोरोनाचा हा ३० वा बळी आहे.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात एका ५२ वर्षीय व्यक्तीवर उपचार सुरु होते. या कोरोना बाधित रुग्णाला उच्च रक्तदाब, मधुमेह, फुफ्फुसाचा त्रास असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसापासून या रुग्णावर उपचार सुरु होते मात्र, आज या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात करोना संक्रमितांचा आकडा वाढतोय आहे. राज्यात करोनाबाधितांचा आकडा २१५ वर पोहोचला आहे. १२ तासात १२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. पुणे ५, मुंबई ३, नागपूर २, कोल्हापूर १ आणि नाशिकमध्ये १ नवे रुग्ण सापडले आहेत. पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या ३९वर पोहोचली असून महाराष्ट्रात एकूण २०७ कोरोनाग्रस्त आहेत. पुण्यात आणखी २ कोरोना बाधित आढळले आहेत. एक पुरूष आणि एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. हे दोन्ही रूग्ण पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील रहिवाशी आहेत.

नागपूरमध्येही २ कोरोना संक्रमित रुग्ण वाढले असून आता कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या १६ झाली आहे. नागपूरमधील एक व्यापारी दिल्लीतून नागपूरला आल्यानंतर २५ मार्चला त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्याच्या संपर्कात आलेल्या २ रुग्णांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews’

हे पण वाचा –

महाराष्ट्रात करोनाबाधितांचा आकडा २१५वर

धक्कादायक! अमेरिकेत १ ते २ लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती

जगातील पहिल्या कोरोनाग्रस्ताचा लागला शोध, कोण आहे ‘हा’ व्यक्ती? घ्या जाणून

भारत कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे म्हणजे नेमकं काय?

इटलीमध्ये कोरोनाचे एवढे बळी का?

नेटफ्लिक्सवर ‘या’ वेबसिरिजमध्ये करण्यात आली होती कोरोना व्हायरसची भविष्यवाणी! घ्या जाणुन

Leave a Comment