हिंगणघाटच्या नराधमाला ‘हैद्राबाद’ सारखी शिक्षा द्या – प्रणिती शिंदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे घडलेल्या घटनांचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. सोलापुरात जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शन करण्यात आली. हिंगणघाटच्या नराधमाला हैद्राबाद सारखी शिक्षा द्या अशी उद्विग्न प्रतिक्रिया आमदार प्रणिती शिंदे यांनी यावेळी दिली.

कायदे असून देखील अशा घटना वारंवार घडत आहेत. अशा नराधमांना ९० दिवसात शिक्षा झाली पाहिजे. असे काही होत नसेल तर हैद्राबाद सारखं काही तरी करा अशी उद्विग्न प्रतिक्रिया प्रणिती शिंदे यांनी दिली. तुमचा कोणी छळ करत असेल तर घरच्यांना सांगा, पोलिसांपर्यंत जा, गप्प बसू नका असे आवाहन प्रणिती शिंदे यांनी मुलींना केले. प्रणिती शिंदे पुढे म्हणाल्या, हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेली ती मुलगी लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी आपण प्रार्थना करू या.

गेल्यावर्षी हैद्राबाद येथे नोव्हेंबरमध्ये अशाच प्रकारची क्रूर घटना घडली होती. नराधमांनी मुलीवर अत्याचार करून तिला जाळून टाकले होते. या घटनेचे संतप्त पडसाद देशभर उमटले. या संतप्त प्रतिक्रियेनंतर पोलिसांनी या प्रकरणात आरोपी असलेल्या तिघांचा एन्काउंटर केला. या एन्काऊंटर नंतर देशभर या पोलिसांच्या या कारवाईचे जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच काहींनी या कारवाईच्या विरोधात देखील प्रतिक्रिया दिल्या. आता हिंगणघाट येथील घटनेनंतर आशाच प्रकारची शिक्षा नराधमाला द्यावी अशी मागणी होत आहे.

Leave a Comment