वीज बिलांसंबंधी राज्य सरकार अडलंय कुठं?? राज ठाकरेंचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शालिनी ठाकरे, रिटा गुप्ता आणि शिरीष सावंत आदी होते. या सर्वांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन 10 ते 15 मिनिटं चर्चा केली. वाढीव वीज बिलासंबंधी राज ठाकरेंनी राज्यपालांची भेट घेतली.

यावेळी राज ठाकरे म्हणाले, मी इथे प्रश्नोत्तरासाठी आलेलो नाही. लोकांना येत असलेल्या वीजबिलासंदर्भात मी चर्चा केली. वाढीव वीजबिलाचा विषयावरून गेले काही दिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि माझे सैनिक आंदोलनं करीत आहेत. सर्व जण येऊन भेटून गेलेत. वीजबिल जी आहेत ती आम्ही कमी करू शकतो, असं सरकार सांगतंय. त्यासाठी आमच्या पक्षाचं शिष्टमंडळ जाऊन MERCला भेटून आले. पण MERC सांगतंय आमचं काहीही दडपण नाही, कंपन्या बिलं कमी करू शकतात. नितीन राऊतांना सांगितलं तर हे बघतो बोलते. सगळंच तयार आहेत मग राज्य सरकार अडलंय कुठं?, धरसोडपणा सोडून कधी काय होणार आहे ते सांगा, असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

राज्यपालांशी बोलल्यानंतर ते बोलले पवार साहेबांशी बोलून घ्या, मुख्यमंत्र्यांशी बोलून घ्या, पवारांना मी फोन करणार आहे. जिथे 2 हजार बिलं येत होती तिथे लोकांना 10 हजार बिलं आता येत आहेत. त्यासाठी पहिलं निवेदन राज्यपालांना दिलं आहे. कुठली गोष्ट सांगितल्यावर काम चालू आहे, असं सांगितलं जातं, पण त्यावर निर्णय होत नाही. ही पाच पट, सहा पट बिलं बेरोजगारांनी कुठून भरावीत ते सांगा. लवकरात लवकर निर्णय होईल, अशी आशा असल्याचंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment